सोयाबीनचा भाव वाढेल या आशेने अनेकांनी सोयाबीन विक्री केली नाही. मात्र सर्व हंगाम संपून गेला तरी सोयाबीनच्या भावात काही वाढ झाली नाही. याउलट सोयाबीनचा दर सातत्याने घटल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी अगदी कमी दरात सोयाबीनची विक्री केली तर ज्यांना अद्याप भाववाढीची अपेक्षा आहे त्यांनी साठा करून ठेवला आहे.
गतवर्षीच्या हंगामात सोयाबीनचा सहा हजार रुपये प्रतिक्विंटलवर दर गेला होता, त्यानंतर मात्र एकदा काय भावात घसरण झाली ते पुन्हा पाच हजार पार एकदाही गेला नाही. खरिपाच्या पेरणी वेळेस सोयाबीनची आवक वाढली होती; मात्र सध्या तरी सोयाबीनची आवक घटल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
बाजारभाव काय?
धान्य | (प्रतिक्विंटल) |
हळद | १४५०० |
ज्वारी | २१०० |
तीळ | ११६५० |
गहू | २६०० |
तूर | १०३५० |
हरभरा | ५८०० |
भूईमूग | ६६०० |
बाजरी | २२०० |
मोहरी | ५६०० |
सोयाबीन | ४३०० |
गव्हाचे भाव वाढले
■ यावर्षी रब्बी हंगामात गव्हाचे विक्रमी उत्पादन झालेले आहे. त्यामुळे बाजारात आवक वाढल्याने भाव घसरले.
■ तर सध्या मागच्या महिन्यापेक्षा गव्हाची आवक घटल्याने भावात चांगलीच वाढ झाली.
कोण काय म्हणतय
सोयाबीनच्या भावात सध्याच वाढ होईल असे वाटत नाही. नव्या हंगामातील माल बाजारपेठेत आल्यावर सोयाबीनला नवा भाव मिळू शकतो. हळदीच्या भावात काहीशी वाढ होईल. - धनंजय कदम, व्यापारी.
खरिपाच्या तोंडावर सोयाबीनच्या भावात वाढ होईल अशी अपेक्षा होती; मात्र भावात काहीच बदल झाला नाही. शेतकऱ्यांनी कमी भावात सोयाबीन विक्री करून बी- बियाणे खरेदी केले. - गोविंद लांडे, शेतकरी.
हेही वाचा - Soybean Crop Management शेतकऱ्यांनो, सोयाबीन पिवळं पडण्यामागील जाणून घ्या कारणे आणि उपाय