Join us

Onion Rates : निर्यात सुरू पण कांद्याचे दर जैसे थे! शेतकऱ्यांना किती मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 9:12 PM

दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांदा निर्यात अटी व शर्तींसह खुली केली आहे.

सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मागच्या ऑगस्ट महिन्यापासून हाल सुरू असून कांद्याला दर नसल्याने मातीमोल दरात कांदा विक्री करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने निर्यात खुली केली तरीही महाराष्ट्रातील कांद्याला चांगला दर मिळताना दिसत नाही. 

दरम्यान, आज कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, सोलापूर, धुळे, जळगाव, नागपूर, साक्री, सांगली, पुणे, मोशी, शेवगाव, नागपूर, अहिल्यानगर, येवला, नाशिक, लासलगाव, निफाड, विंचूर, मालेगाव-मुंगसे, जुन्नर-ओतूर, चांदवड, मंचर, सटाणा, पिंपळगाव बसवंत, पारनेर या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली होती. यामध्ये उन्हाळा आणि लाल कांदा जास्त होता.

आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर हा कराड आणि पेन बाजार समितीमध्ये मिळाला असून या ठिकाणी प्रतिक्विंटल कांद्याला २ हजार २०० रूपये दर मिळाला. तर छत्रपती संभाजीनगर, शेवगाव आणि राहुरी-वांबोरी या बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ ९०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

केंद्र सरकारने कांदा निर्यात खुली केली पण ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य आणि ४० टक्के निर्यातशुल्क अशा दोन अटी घातल्यामुळे कांद्याच्या देशांतर्गत दरामध्ये जास्त फरक पडला नाही. परिणामी त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होताना दिसत नाही. 

आजचे सविस्तर कांद्याचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/05/2024
कोल्हापूर---क्विंटल580470022001400
अकोला---क्विंटल75480015001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल45903001500900
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल820120017501500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10106140020001700
खेड-चाकण---क्विंटल100130018001600
सातारा---क्विंटल44750020001250
कराडहालवाक्विंटल198150022002200
सोलापूरलालक्विंटल3216610021001150
धुळेलालक्विंटल265520015501360
जळगावलालक्विंटल18765001375950
नागपूरलालक्विंटल2200100015001375
पेनलालक्विंटल381220024002200
साक्रीलालक्विंटल402570015251200
भुसावळलालक्विंटल70120016001500
हिंगणालालक्विंटल4170018001800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल286960021001350
पुणेलोकलक्विंटल1132560018001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल34100016001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11140020001700
पुणे-मांजरीलोकलक्विंटल9980017001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल11305001400950
वडगाव पेठलोकलक्विंटल230160018001700
इस्लामपूरलोकलक्विंटल37150020001750
वाईलोकलक्विंटल15100022001800
मंगळवेढालोकलक्विंटल3915012501000
कामठीलोकलक्विंटल4150025002000
शेवगावनं. १नग4330100014001400
कल्याणनं. १क्विंटल3200022002100
शेवगावनं. २नग3050600900900
शेवगावनं. ३नग1722100400400
नागपूरपांढराक्विंटल2000110015001400
अहमदनगरउन्हाळीक्विंटल8713515016501250
येवलाउन्हाळीक्विंटल800025117901500
नाशिकउन्हाळीक्विंटल602455017001400
लासलगावउन्हाळीक्विंटल294650020001500
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल376085120011650
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1280055023001700
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1800050019931500
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल1106450021001500
सिन्नरउन्हाळीक्विंटल330830017001450
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल179650016211450
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल62501001700900
चांदवडउन्हाळीक्विंटल1920070019511500
मनमाडउन्हाळीक्विंटल220030017001450
मंचरउन्हाळीक्विंटल1350050019001200
सटाणाउन्हाळीक्विंटल1440510019751535
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2875040021051500
पारनेरउन्हाळीक्विंटल2678220018001225
रामटेकउन्हाळीक्विंटल44100014001200
देवळाउन्हाळीक्विंटल314040020201600
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकांदा