काही दिवसांपासून हरभऱ्याचे दर स्थिर होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून अचानकपणे भावात घसरण झाली आहे. बुधवारी सर्वसाधारण ५ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.
गत पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने खरीपातील उत्पादनात घट झाली होती. त्याचबरोबर रब्बी हंगामातील काही पिकांवर परिणाम झाला. रब्बीत लातूर जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झाला होता. राशी झाल्यानंतर आर्थिक अडचणींतील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली.
सुरुवातीपासूनच हरभऱ्याचे दर स्थिर होते. आगामी काळात आणखीन दर वाढतील, अशी शेतकऱ्यांना आशा लागून होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून भावात घट होण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या शेतकरी खरीप हंगामपूर्व शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे आर्थिक गरज भासत आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत...
• दोन- तीन वर्षापूर्वी सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला होता. त्यामुळे आगामी काळातही दरवाढ होईल, या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे लक्ष केंद्रित केले होते. मात्र, गेल्या दोन वर्षापासून दरवाढ झाली नाही.
• त्यामुळे काही शेतकऱ्यांनी अद्यापही विक्री केली नाही. मात्र, अद्यापही अपेक्षित दर मिळत नसल्याने मोठी अडचण झाली आहे.
हरभरा उत्पादकांना दर वाढीची आशा...
तारीख | आवक | साधारण भाव |
८ मे | ७२०९ | ५९०० |
६ मे | २८८४ | ५८०० |
४ मे | ३२४५ | ५९०० |
२९ एप्रिल | १११५९ | ६१०० |
२७ एप्रिल | ७९५४ | ६१०० |
२६ एप्रिल | ३२७३ | ६२०० |
२५ एप्रिल | ५१२४ | ६००० |
२४ एप्रिल | ७४१५ | ६००० |
हेही वाचा - निंबोळी अर्काच्या वापरामुळे वाचतो २५ टक्क्याहून अधिक कीटकनाशकांचा खर्च