ग्राहकांच्या हिताचा विचार करून केंद्राने घेतलेले अनेक निर्णय शेतकऱ्यांसाठी 'सुल्तानी' ठरल्याचं भूतकाळात आपल्याला पाहायला मिळालं. यंदाही तेच झालं असून कांद्याच्या निर्यात शुल्कात तब्बल ४० टक्के वाढ केल्यानंतर पुन्हा निर्यात मूल्य २०० डॉलरवर नेल्याने एका आठवड्यापासून वाढलेले कांद्याचे दर कोसळले आहेत.
केंद्र सरकारच्या निर्यातशुल्क वाढीच्या निर्णयानंतर कांद्याची निर्यात थांबली होती. यामुळे शेतकऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलने आणि निदर्शने केले होते. पण त्यानंतरही केंद्राने निर्यात मुल्यात वाढ करून ते २०० डॉलरवर नेऊन ठेवले. त्यामुळे कांदा निर्यातीचे कंबरडे मोडले असून देशांतर्गत कांद्याचे भावही गडगडले आहेत.
दरम्यान, आजच्या कांदाबाजारभावाचा विचार केला तर ७ ते ८ हजार रूपये प्रतिक्विंटल मिळत असलेला दर थेट २ ते ३ हजारांवर येऊन ठेपला आहे. आज २ हजार ३५० कमीत कमी तर ३ हजार ५०० जास्तीत जास्त सरासरी दर मिळाला आहे. राहुरी बाजार समितीत ५०० रूपयांपासून ४ हजार २०० रूपयांपर्यंत दर मिळाला तर जुन्नर बाजार समितीत आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ४ हजार ५१० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे.
जाणून घेऊया आजचे कांद्याचे सविस्तर बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
05/11/2023 | ||||||
राहूरी | --- | क्विंटल | 3855 | 500 | 4200 | 2350 |
राहता | --- | क्विंटल | 2146 | 1300 | 4200 | 2800 |
जुन्नर | चिंचवड | क्विंटल | 4900 | 1000 | 4510 | 3000 |
पुणे | लोकल | क्विंटल | 13009 | 2000 | 4000 | 3000 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 30 | 2500 | 4500 | 3500 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 364 | 1500 | 3800 | 2650 |
कोपरगाव | उन्हाळी | क्विंटल | 1000 | 1000 | 3800 | 3501 |
पारनेर | उन्हाळी | क्विंटल | 4968 | 700 | 4500 | 3100 |
भुसावळ | उन्हाळी | क्विंटल | 12 | 3000 | 3500 | 3300 |
वैजापूर- शिऊर | उन्हाळी | क्विंटल | 278 | 800 | 3700 | 3000 |