Join us

केंद्राच्या खेळीनंतर कांद्याच्या दराला उतरती कळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 6:26 PM

कांद्याचे किंवा इतर उत्पादनाचे दर स्थिर राहावेत यासाठी केंद्र सरकारकडून अनेकदा शेतकरीविरोधातील निर्णय घेण्यात येतात.

ग्राहकांच्या हिताचा विचार करून केंद्राने घेतलेले अनेक निर्णय शेतकऱ्यांसाठी 'सुल्तानी' ठरल्याचं भूतकाळात आपल्याला पाहायला मिळालं. यंदाही तेच झालं असून कांद्याच्या निर्यात शुल्कात तब्बल ४० टक्के वाढ केल्यानंतर पुन्हा निर्यात मूल्य २०० डॉलरवर नेल्याने एका आठवड्यापासून वाढलेले कांद्याचे दर कोसळले आहेत. 

केंद्र सरकारच्या निर्यातशुल्क वाढीच्या निर्णयानंतर कांद्याची निर्यात थांबली होती. यामुळे शेतकऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलने आणि निदर्शने केले होते. पण त्यानंतरही केंद्राने निर्यात मुल्यात वाढ करून ते २०० डॉलरवर नेऊन ठेवले. त्यामुळे कांदा निर्यातीचे कंबरडे मोडले असून देशांतर्गत कांद्याचे भावही गडगडले आहेत. 

दरम्यान, आजच्या कांदाबाजारभावाचा विचार केला तर ७ ते ८ हजार रूपये प्रतिक्विंटल मिळत असलेला दर थेट २ ते ३ हजारांवर येऊन ठेपला आहे. आज २ हजार ३५० कमीत कमी तर ३ हजार ५०० जास्तीत जास्त सरासरी दर मिळाला आहे. राहुरी बाजार समितीत ५०० रूपयांपासून ४ हजार २०० रूपयांपर्यंत दर मिळाला तर जुन्नर बाजार समितीत आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ४ हजार ५१० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. 

जाणून घेऊया आजचे कांद्याचे सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/11/2023
राहूरी---क्विंटल385550042002350
राहता---क्विंटल2146130042002800
जुन्नरचिंचवडक्विंटल4900100045103000
पुणेलोकलक्विंटल13009200040003000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल30250045003500
पुणे-मोशीलोकलक्विंटल364150038002650
कोपरगावउन्हाळीक्विंटल1000100038003501
पारनेरउन्हाळीक्विंटल496870045003100
भुसावळउन्हाळीक्विंटल12300035003300
वैजापूर- शिऊरउन्हाळीक्विंटल27880037003000
टॅग्स :शेती क्षेत्रकांदासोयाबीनशेतकरीबाजारमार्केट यार्डपुणे