Join us

बाजार समित्यांबाहेर शेतकऱ्यांचे आंदोलन, पोलिस बंदोबस्त वाढला

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 21, 2023 2:47 PM

लासलगाव बाजार समिती व्यापारी असोसिएशनने नाशिक जिल्ह्यातील १५ प्रमुख बाजार समितीमध्ये कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार बेमुदत बंद केले आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडूनही आंदोलन उभारले जात आहे.

कांदा निर्यातीवर ४०% निर्यात शुल्क आकारल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. लासलगाव बाजार समिती व्यापारी असोसिएशनने नाशिक जिल्ह्यातील १५ प्रमुख बाजार समितीमध्ये कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार बेमुदत बंद केले आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडूनही आंदोलन उभारले जात आहे. आज सकाळपासून लासलगाव बाजार समितीच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त वाढला आहे. 

सरकारने कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर नाशिक व पुणे जिल्ह्यात शेतकर्यांनी आंदोलन सुरू केले आहे. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत तसेच पिंपळगाव, सायखेडा, विंचूर समित्यांमध्ये सकाळी नऊच्या सुमारास अनुक्रमे ७००, २००, ९०० नग एवढाच कांदा आला होता. या समितांमधील किमान कांद्याची आवक ही सरासरी २००० ते २६०० इतकी असते. 

नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बेमुदत बंद  झाल्या असून लासलगाव बाजार समितीच्या आवारावर आज एकही ट्रॅक्टर सकाळपासून दिसला नाही आज लिलाव बंद राहिल्याने दोन ते तीन कोटी रुपयांच्या होणाऱ्या आर्थिक उलढलीस मोठे ग्रहण लागणार आहे. 

लासलगाव बाजार समिती गजबजलेली बाजार समिती आहे आज लिलाव बंद असल्याने किमान दोन ते तीन लाख रुपयांची चलन दळणवळण ठप्प झालेले आहे तर जिल्ह्यात २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

केंद्र सरकारची अधिसूचना निघण्याअगोदर अनेक निर्यातदार व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कांदा हा निर्यातीसाठी रवाना झाल्याने रस्त्यातच हा माल अडकला आहे याचा मोठ्या प्रमाणात फटका व्यापाऱ्यांना बसला असल्याची चर्चा या बैठकीत झाली. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क ४० टक्के वाढवल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे.

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डनाशिकपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीस्वाभिमानी शेतकरी संघटना