सत्यशिल धबडगे
कापसाचे बाजारभाव हमीदराजवळ आले असताना दोन महिन्यांत सीसीआयने केवळ २१ हजार कापसाची खरेदी केल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन पीक पेऱ्याच्या जाचक अटींमुळे इच्छा असूनही अनेक शेतकऱ्यांना सीसीआयला कापूस विक्री करता आला नाही. परिणामी ९८३ शेतकऱ्यांनीच कापूस विक्री केला आहे. फेब्रुवारी महिन्यात कापसाचे दर हमीदराच्या वर गेल्याने सद्य:स्थितीत मागील महिनाभरापासून सीसीआयची केंद्रे बंद झाली आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील मानवत कृउबा समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डात जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदीला या वर्षी १७ नोव्हेंबरला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी लिलावात कापसाला सरासरी सात हजार ३०० रुपये दर मिळाला. परंतु शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा असल्याने आवक कमी होती. खरेदी सुरू होऊनदेखील दरात वाढ न झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली. डिसेंबर महिन्यात कापसाला सरासरी ७ हजार २५० रुपयांचा दर मिळाला. यातच तालुक्यात झालेल्या पावसामुळे कापसाचे दर खालावले. रेनटच कापसाला सरासरी ६ हजार ते ६ हजार ४०० रुपयांचा दर मिळत होता.
या दरम्यान कापसात प्रति क्विंटलमागे एक हजार रुपयांची घसरण झाली. यामुळे तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली होती. यादरम्यान आर्थिक नियोजन कोलमडले. सध्या कापसाचे दर हमीदराच्या जवळ आले असताना सीसीआयकडून कापूस खरेदी होणे अपेक्षित होते. मात्र यंदाच्या हंगामात सीसीआयने ऑनलाइन पीक पेन्याची आट घातली.
अनेक शेतकन्यांकडे ऑनलाइन पीक पेऱ्याची नोंद नसल्याने इतरत्र कापूस विकास लागला. १२ डिसेंबर ते १३ फेब्रुवारीदरम्यान सीसीआयने केवळ २१ हजार ३०६ क्विंटल खरेदी केली आहे. १३ फेब्रुवारीपासून कापसाच्या दरात तेजी पाहावयास मिळाली हमीदरापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. सद्य:स्थितीत आठ हजारावर दर मिळत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात असून दुसरीकडे सीसीआयचे केंद्र मागील महिनाभरापासून बंद झाले आहे.
ऑनलाइन विक्री करतांना जरा जपून; तुमची सुध्दा होऊ शकते फसवणूक
९८३ शेतकऱ्यांना १५ कोटींचे चुकारे
• कापसाचे भाव हमीदराजवळ आले असताना सीसीआयने कापूस लिलावात एकवीस हजार तीनशे सहा विचटल कापसाची खरेदी केली.
• कापूस विक्री करणाऱ्या ९८३ शेतकऱ्यांना सीसीआयने १४ कोटी ८८ लाख ७४ हजार २४९ रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कापूस विक्री केल्यानंतर आठवडाभरातच वर्ग केले आहेत.
रेनटचमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
• कापूस वेचणीच्या वेळेस झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. या कापसाला पावसाचा फटका बसल्याने बाजारात कमी भाव मिळत आहे. अगोदरच असलेला कमी भाव आणि त्यात रनटचच्या कारणाने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
• यावर्षी उशिरा पाऊस झाल्याने कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली नाही. त्यातच अनेक संकटे ओढावल्याने कापूस मोठ्या प्रमाणात निघाला नाही. त्यातही भाव कमी आहेत. पुढील वर्षी कापूस लागवड करायचा की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
८ हजार १२० रुपये दर
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डात शनिवारी झालेल्या कापूस लिलावात कापसाला ८ हजार १२० रुपये वरचा दर मिळाला तर सरासरी दर ८ हजार ७५ रुपये मिळाला. रेन टच कापसाला ६ हजार ८०० ते ७ हजार दर मिळाला.