Lokmat Agro >बाजारहाट > शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीची प्रतीक्षा, खरेदी केंद्रावर शुकशुकाट

शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीची प्रतीक्षा, खरेदी केंद्रावर शुकशुकाट

Farmers waiting for cotton price hike, shopping centers are busy | शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीची प्रतीक्षा, खरेदी केंद्रावर शुकशुकाट

शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीची प्रतीक्षा, खरेदी केंद्रावर शुकशुकाट

शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करीत असल्याने कापूस खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ असल्याचे दिसून येत आहे.

शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करीत असल्याने कापूस खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ असल्याचे दिसून येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा आणि बोदवड या चार ठिकाणी केंद्रीय कापूस खरेदीचे केंद्र (सीसीआय) आहेत. हे सर्व केंद्र सुरू होऊन जवळपास 15 दिवस उलटले आहे. परंतु शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करीत असल्याने या केंद्रांवर पाहिजे त्या प्रमाणात कापूस येत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे ही केंद्रे बंद पडतात की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.

गेल्या काही महिन्यात कापसाचे दर (Cotton Rate) घसरल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आहे तो कापूस विकण्याऐवजी साठवला जात आहे. मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून कापूस खरेदीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून सीसीआयने राज्यात 78 कापूस संकलन केंद्र सुरू केली आहेत. मात्र या केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ असल्याचे पाहायला मिळत आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात चार केंद्रे असून शेतकरी कापूस आणत नसल्याने सर्वच सीसीआय केंद्रांवर शुकशुकाट आहे. याला दोन-तीन कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे. 

एकीकडे कापूस खरेदी केंद्रावर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. एकतर केंद्रीय कापूस खरेदी यंदापासून ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने शेतकऱ्यांना आधार कार्ड व मोबाइल क्रमांक लिंक करावा लागत आहे. त्यात दुसरी अडचण म्हणजे, कापसाला सीसीआयकडून 7 हजार 200 रुपये हा भाव दिला जात असताना कापूस विक्रीची रक्कम शेतकऱ्यांना 15 ते 20 दिवसांनी मिळत असल्याने या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.


15 दिवसांत केवळ 300 क्विंटल कापूस

सीसीआयच्या बोदवडच्या केंद्रावर 15 दिवसात केवळ 300 क्विंटल कापूस खरेदी झाली, तर जामनेर, पाचोरा या केंद्रांवरही हीच स्थिती आहे. फक्त शेंदुर्णी केंद्रावर कापूस आवक बऱ्यापैकी आहे, अशी माहिती बोदवड येथील खरेदी केंद्राचे अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली. खासगी जिनिंगमध्ये कापसाची आवक घटली आहे. कापसाच्या भाववा- ढीचीही अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे जिनिंगवरही शुकशुकाट आहे. यंदा एकतर कापसाला भाव नसल्यामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजकही मंदीची झळ सोसत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर नोंद करूनच कापूस आणावा, असे आवाहन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Farmers waiting for cotton price hike, shopping centers are busy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.