Join us

Flower Market : निवडणुकीमुळे बाजारात फुलांना मागणी वाढली; फुल बाजारात दर वधारले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 2:18 PM

सध्या राज्यात निवडणुक (Election) दरम्यान बाजारात फुलांना (Flower Market) मागणी वाढली असून, फूल उत्पादक शेतकऱ्यांना (Flower Producer Farmer) चांगला आर्थिक लाभ होत आहे. तसेच फुलांनी बनविलेला हार तयार करणाऱ्या कारागिरांनाही रोजगार मिळत असल्याचे फुल भांडार विक्रेत्यांनी सांगितले.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू असून, प्रचारासाठी दिग्गज नेत्यांना बोलविण्यात येत आहे. विविध पक्षांचे उमेदवार आप आपल्या मतदारसंघात कॉर्नर सभा घेऊन पदयात्रा, रॅली काढत आहेत. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून फुले उधळून, क्रेनद्वारे भलामोठा पुष्पहार घालून उमेदवारांचे, नेत्यांचे जंगी स्वागत केले जात आहे.

ज्यामुळे निवडणुक दरम्यान बाजारात फुलांना मागणी वाढली असून, फूल उत्पादक शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होत आहे. तसेच फुलांनी बनविलेला हार तयार करणाऱ्या कारागिरांनाही रोजगार मिळत असल्याचे फुल भांडार विक्रेत्यांनी सांगितले.

राजकीय सभेत, रॅलीत किंवा मोठ्या नेत्यांच्या स्वागतासाठी क्रेनद्वारे १५ ते २० फुटांचा हार घालण्याचा 'ट्रेंड' सध्या जोरात आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, नेत्यांच्या, उमेदवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून हारांची मागणी वाढली आहे. दरम्यान, जळगावात झेंडूच्या फुलांना मागणी देखील चांगलीच वाढली आहे. 

हार बनविण्यासाठी लागतात चार तास

साधारणतः पंधरा थरांमध्ये १५ ते २० फुटांचा हार बनविला जातो. हा हार बनविण्यासाठी झेंडू, अष्टर, शेवंती या फुलांचा वापर केला जात आहे. १५ ते २० फुटांच्या हारासाठी साधारण १०० ते १३० किलो फुलांचा वापर केला जात असतो. अशा प्रकारे हार बनविण्यासाठी पाच ते सहा कारागिरांना साधारण तीन ते चार तास लागत असल्याचे फुलमाळा विक्रेत्यांनी सांगितले.

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील आजची फुलांची आवक व दर

शेतमाल : झेंडूजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/11/2024
पुणेलोकलक्विंटल185200040003000
शेतमाल : शेवंतीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/11/2024
पुणे---नग171100200150
पुणे---क्विंटल19200060004000
पुणेनं. १क्विंटल22300060004500
शेतमाल : गुलाबजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/11/2024
पुणे---क्विंटल650001500010000
पुणेलोकलनग4610102015
पुणेनं. १नग398080160120
शेतमाल : गुलछडीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/11/2024
पुणे---नग376103020
पुणे---क्विंटल305000100007500

हेही वाचा : आर्द्रतेच्या निकषांमुळे सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावरही प्रतिसाद मिळेना; खासगी बाजारात कापसाचे दर मात्र कमीच

टॅग्स :फुलंबाजारनिवडणूक 2024शेतकरीमार्केट यार्डशेती क्षेत्र