Lokmat Agro >बाजारहाट > भारतीय अन्न महामंडळाकडून गहू आणि तांदूळ विक्रीसाठी लिलाव सुरु

भारतीय अन्न महामंडळाकडून गहू आणि तांदूळ विक्रीसाठी लिलाव सुरु

Food Corporation of India launches auction for sale of wheat and rice | भारतीय अन्न महामंडळाकडून गहू आणि तांदूळ विक्रीसाठी लिलाव सुरु

भारतीय अन्न महामंडळाकडून गहू आणि तांदूळ विक्रीसाठी लिलाव सुरु

किंमत स्थिरतेचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल या अनुषंगाने गव्हाच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय गोदामातील साठयातून ५० लाख मेट्रिक टन गहू पिठाच्या गिरण्या/प्रक्रियाकर्ते/गहू उत्पादनांच्या उत्पादकांना खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) अंतर्गत ई-लिलावाद्वारे प्रति पॅन कार्ड ३०० (मेट्रिक टन) च्या मर्यादेसह गहू देण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

किंमत स्थिरतेचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल या अनुषंगाने गव्हाच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय गोदामातील साठयातून ५० लाख मेट्रिक टन गहू पिठाच्या गिरण्या/प्रक्रियाकर्ते/गहू उत्पादनांच्या उत्पादकांना खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) अंतर्गत ई-लिलावाद्वारे प्रति पॅन कार्ड ३०० (मेट्रिक टन) च्या मर्यादेसह गहू देण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिनांक १३.०६.२०२३ च्या पत्राद्वारे खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) च्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मान्यता दिली होती. ०६.०२.२०२४ पर्यंत, खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) द्वारे १०,२२,९०७ मेट्रिक टन गहू आणि २,९७५ मेट्रिक टन तांदूळ उचलण्यात आला आहे. भारतीय अन्न महामंडळाकडून गहू आणि तांदूळ बाजारात आणल्याने गहू आणि तांदळाच्या किमतींवरील महागाईवर प्रतिबंधात्मक प्रभाव पडतो.

किंमत स्थिरतेचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल या अनुषंगाने गव्हाच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय गोदामातील साठ्यातून ५० लाख मेट्रिक टन गहू पिठाच्या गिरण्या/प्रक्रियाकर्ते/गहू उत्पादनांच्या उत्पादकांना खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) अंतर्गत ई-लिलावाद्वारे प्रति पॅन कार्ड ३०० (मेट्रिक टन) च्या मर्यादेसह गहू देण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

त्याचप्रमाणे ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) द्वारे २५ लाख मेट्रिक टन तांदूळ विक्रीला मान्यता दिली आहे.आजपर्यंत गव्हाचे ३४ तर तांदळाचे ३१ लिलाव झाले आहेत. या लिलावात १६,१६,२१० मेट्रिक टन गहू आणि १४,०७,९१४ मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला.

रास्त सामान्य गुणवत्तेच्या गव्हासाठी रुपये २,१५०/क्विंटल आणि शिथिल वैशिष्ट्यांअंतर्गत असलेल्या गव्हासाठी रुपये २,१२५/क्विंटल आणि फोर्टिफाइड तांदळासाठी रुपये २,९७३/क्विंटल आणि एफएक्यू तांदूळासाठी रुपये २,९००/क्विंटल राखीव किमतीवर गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी १२,०७,६५५ मेट्रिक टन गहू आणि ३,८७७ मेट्रिक टन तांदूळ हे स्वीकारलेले प्रमाण आहे. भारतीय अन्न महामंडळाकडून गहू आणि तांदूळ विक्रीसाठी लिलाव ०८.०६.२०२३ पासून आणि नंतर दर बुधवारी सुरू झाला.

तसेच, खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) अंतर्गत 'भारत आटा' आणि 'भारत चावल' ब्रँड अंतर्गत विक्रीसाठी केंद्रीय भंडार/एनसीसीएफ/नाफेड/महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित (एमएससीएमएफएल) यांसारख्या निम-सरकारी आणि सहकारी संस्थांना ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने गहू आणि तांदळचे अतिरिक्त वाटप केले आहे.

०६.०२.२०२४ पर्यंत, या संस्थांना ९४,९२० मेट्रिक टन गहू आणि १३,५४८ मेट्रिक टन तांदूळ वाटप करण्यात आले असून त्यापैकी ५४,३४३ मेट्रिक टन गहू आणि २०० मेट्रिक टन तांदूळ उचलण्यात आला आहे.या संस्थांना गहू १,७१५ रुपये/क्विंटल आणि तांदूळ १८.५९ रुपये/किलो दराने दिला जात आहे.या संस्था सर्वसामान्य ग्राहकांना ५ किलो/१० किलो पॅकेजमध्ये २७.५०/किलो (आटा) आणि २९/किलो (तांदूळ) दराने  विक्री करतील.

Web Title: Food Corporation of India launches auction for sale of wheat and rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.