गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात हंगाम सुरू झाला आहे. रविवारी फळ बाजारात ४ ते साडेचार टन द्राक्षांची आवक झाली असून, बारामती, इंदापूर, जुन्नर येथून ही द्राक्षे येतात. सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतूनदेखील द्राक्षांची आवक होते. या द्राक्षांचा हंगाम डिसेंबरमध्ये सुरू होतो तो एप्रिल अखरेपर्यंत चालतो.
सध्या पंढरपूर, सांगोला, सोलापूर, फलटण, बारामती, इंदापूर या भागांतून तसेच सांगली भागातून काही ठिकाणांवरून मालाची आवक होत आहे. द्राक्षाचा हंगाम डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू होतो. या काळात सर्वच भागांतून मालाची आवक सुरू आहे. हंगामात आवक जास्त असल्याने शेतकऱ्यांना साधारण दर मिळतो. हंगामात द्राक्षांचा घाऊक बाजारात एका किलोचा प्रतवारीनुसार ५० ते ५५ रुपये दर मिळतो तर चांगल्या प्रतीच्या सुपर सोनाकाला किलोसाठी ८० ते १२० रुपये दर मिळत आहे.
या भागातून होते आवक
- पुण्यात द्राक्षांची आवक सर्वाधिक (८० टक्के) सांगली जिल्ह्यातील तासगाव भागातून होते.
- साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ही आवक सुरू होते. सोलापूर जिल्ह्यातून मार्चमध्ये द्राक्षांची आवक होते.
- नाशिकची दाक्षे प्रामुख्याने मुंबई आणि मध्य प्रदेशात पाठवली जातात.
असे आहेत बाजारभाव (१० किलोचे दर)
६०० ते ११०० सुपर सोनाका
५०० ते ७०० ता. ए. गणेश
८०० ते १२०० जम्बो सुपर सोनाका
अवकाळी पावसात काही बागा सापडल्या आहेत तो माल विक्रीस बाजारात आला. बाजारात मालाची आवक साधारण आहे. येणारा माल चांगला, उच्च दर्जाचा असून तो शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून देणारा असेल. - अरविंद मोरे, व्यापारी