Lokmat Agro >बाजारहाट > द्राक्षोत्पादकांची फसवणूक; व्यापाऱ्यांची धिंड

द्राक्षोत्पादकांची फसवणूक; व्यापाऱ्यांची धिंड

Fraud of grape growers; A merchant's swindle | द्राक्षोत्पादकांची फसवणूक; व्यापाऱ्यांची धिंड

द्राक्षोत्पादकांची फसवणूक; व्यापाऱ्यांची धिंड

व्यापाऱ्यांचे पायलट बनून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या द्राक्ष व्यापाऱ्यांची ओझर पोलिसांनी पिंपळगाव परिसरासह बाजार समिती आवारात धिंड काढली

व्यापाऱ्यांचे पायलट बनून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या द्राक्ष व्यापाऱ्यांची ओझर पोलिसांनी पिंपळगाव परिसरासह बाजार समिती आवारात धिंड काढली

शेअर :

Join us
Join usNext

निफाड तालुक्यात व्यापाऱ्यांचे पायलट बनून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या द्राक्ष व्यापाऱ्यांची ओझर पोलिसांनी पिंपळगाव परिसरासह बाजार समिती आवारात धिंड काढली असून, तिघा व्यापाऱ्यांना पोलिस कोठडी मिळाली आहे. या कारवाईचे परिसरातील शेतकऱ्यांनी स्वागत केले असून, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना चाप बसणार आहे.

निफाड तालुक्यातील सुकेणे, उगावसह परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी द्राक्षांची खरेदी करून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असताना समाधान व्यक्त होत आहे. फसवणूक करणाऱ्या अशा व्यापाऱ्यांपासून सावध राहण्याचे, पिंपळगाव बाजार शेतकऱ्यांना केले. तसेच त्यांना शेतमाल देताना काळजी घ्यावी, तसेच व्यापाऱ्यांच्या एजंटची माहिती पोलिस ठाण्यात द्यावी, असे आवाहन ओझरचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी पिंपळगाव बाजार समितीत शेतकऱ्यांना केले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेतकरी दीपक सुदाम उगले यांनी संशयित आरोपी मनोज साहू कोल्हार, राज्य कर्नाटक, हल्ली मुक्काम चंद्रभागाबाईनगर, पिंपळगाव बसवंत, लक्ष्मण काशीनाथ शिंदे, रा. वनसगाव, ता. निफाड व जितू पाटील, रा. पिंपळगाव बसवंत यांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली होती. फिर्यादी शेतकरी दीपक उगले यांच्या द्राक्षबागेत सुकेणे येथून दि. १७ मार्च २०२२ रोजी बीके फ्रूट कंपनीमार्फत संशयित मनोज साहू याने संशयित लक्ष्मण शिंदे व जितू पाटील यांच्यासोबत जाऊन द्राक्ष मालाचा ४ हजार ५०० रुपये क्विंटलप्रमाणे व्यवहार केला. संशयित मनोज शाहू याने फिर्यादीस द्राक्षमालाचे पहिल्या दिवशी ८३ हजार रोख देऊन खरेदीचा विश्वास संपादन केला. आणखी २०२ क्विंटल ८० किलो द्राक्षमाल तोडून नेला. द्राक्षमालाचे उर्वरित ८ लाख २९ हजार ६०० रुपये रकमेचा आयसीआयसी बँक पिंपळगाव शाखेचा धनादेश त्याने शेतकरी उगले यांना दिला. उगले यांनी धनादेश वटवण्यासाठी वेळोवेळी त्यांच्या पत्नीच्या खात्यात टाकला.

मात्र, संशयित मनोज साहू याने त्याच्या खात्यात जाणूनबुजून पुरेशी रक्कम न ठेवल्याने धनादेश बाउन्स झाला. अशा प्रकारे संशयित तिघांनी संगनमत करून कटकारस्थानाने फिर्यादीचा विश्वास संपादित करीत फिर्यादीचे द्राक्षमालाचे कायदेशीर घेणे असलेली ८ लाख २९ हजार ६०० रुपये आजपर्यंत न देता फिर्यादीची फसवणूक केली. याबाबत ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने संशयितास पिंपळगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकून घेत आरोपीस ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली. ओझर पोलिसांच्या वतीने शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटावी व जनजागृती व्हावी, यासाठी पोलिसांनी आरोपींची पिंपळगाव कृषि उत्पन्न बाजार समिती आवारातून पायी धिंड काढण्यात आली.

आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
न्यायालयाने संशयित आरोपींना पोलिस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी त्यांना पिंपळगाव बाजार समितीत नेऊन शेतकऱ्यांना त्यांची ओळख करून दिली.
- भविष्यात अशा व्यापायांशी कुठलाही व्यवहार करू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांनी 'शेतकऱ्यांचे कैवारी दुर्गेश तिवारी अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी पोलिस कारवाईचे स्वागत केले.
- या कारवाईमुळे आणखी शेतकयांच्या फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता निफाड तालुक्यातून व्यक्त केली जात आहे.

पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सुरू केलेल्या बळीराजा सन्मान हेल्पलाइनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडे अडकलेले पैसे मिळवून दिले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांचे पैसे बाकी असतील त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे. - दुर्गेश तिवारी, पोलिस निरीक्षक, ओझर

पोलिसांनी संशयितांवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांच्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल. - रवी बोरगुडे, शेतकरी, नैताळे

निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापारी व पायलटवर कडक कारवाई करून न्याय मिळवून द्यावा. - महेश शेजवळ, शेतकरी, ओझर

द्राक्ष उत्पादकांचे पैसे बुडविणाऱ्या व्यापारी व पायलटबाबत माजी आमदार अनिल कदम यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रार केली. त्यानंतर कदम यांनी तात्काळ पावले उचलत पोलिसांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे. - रावसाहेब कदम, शेतकरी ओझर

Web Title: Fraud of grape growers; A merchant's swindle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.