Join us

Fruits Market : फळांच्या दरात वाढ; साथीचे आजार, उपवासामुळे बाजारात मागणी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 1:33 PM

एकीकडे श्रावण महिन्यातील उपवास आणि दुसरीकडे वाढत चाललेले साथीचे आजारामुंळे ड्रॅगन फूड, किव्ही यासह सरफरचंद, मोसंबी, संत्री, पपई यासारख्या फळांना मागणी वाढली आहे.

एकीकडे श्रावण महिन्यातील उपवास आणि दुसरीकडे वाढत चाललेले साथीचे आजारामुंळे ड्रॅगन फूड, किव्ही यासह सरफरचंद, मोसंबी, संत्री, पपई यासारख्या फळांना मागणी वाढली आहे.

सद्यःस्थितीत तुळजापूर शहरात संसर्गजन्य आजार व डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. उपजिल्हासह खासगी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. याशिवाय अनेक रुग्ण उपचारासाठी धाराशिव, सोलापूरकडे जात आहेत. यामुळे विशेषतः या रुग्णांना लागणाऱ्या फळांच्या भावात तेजी आली असून, पंधरा दिवसांत भाव दुप्पट झाले आहेत.

यात विशेषतः ड्रैगन, किव्ही व पपई या तीन फळांचे दर दुपटीने वाढले आहेत. उर्वरित डाळिंब, सफरचंद, पेरू मोसंबी, संत्रा याही फळांच्या भावात श्रावणमास उपवासामुळे वाढ झाली असल्याचे फळ विक्रेते रहिम इनामदार यांनी सांगितले.

साधारण पंधरा दिवसांपूर्वी ड्रॅगन फूड शंभर रुपये किलो, किव्ही शंभर रुपये बॉक्स तर पपई चाळीस रुपये किलो या दराने विकली जात होती. मात्र, सध्या या फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने याचे ड्रॅगन दोनशे रुपये किलो, किव्ही पावणे दोनशे रुपये बॉक्स तर पपई ऐंशी ते साठ रुपये किलोवर गेली आहे.

याशिवाय सफरचंद, संत्री, डाळिंब या फळांनी देखील दीडशे ते दोनशे रुपये किलोचा टप्पा गाठला आहे. पेरू, मोसंबी, चिकू शंभर रुपये किलो दराने विकली जात आहे. 

ड्रॅगन, किवी व पपई हे फळ पूर्वी आम्ही ज्या किरकोळ दराने विकत होतो तेच दर आता घाऊक झाले आहेत. परिणामी, या फळांच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे. भाववाढ होऊन देखील या फळांच्या मागणीत वाढ कायम आहे. - रहिम इनामदार, फळ विक्रेते, तुळजापूर.

हेही वाचा - Poultry Success Story : कुक्कुटपालनातील खान्देशभूषण; कोंबडी पालनात 'या' पद्धतीचा वापर करत वार्षिक लाखोंची उलाढाल 

टॅग्स :बाजारतुळजापूरशेती क्षेत्रमार्केट यार्डफळेपाऊस