Know the Future Cotton Market Price in October to December, दसऱ्याच्या दरम्यान कापसाची आवक बाजारात वाढण्याची शक्यता असून यंदा सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जळगाव, अमरावती बाजारसमितीत अगदी थोडा कापूस बाजारात आला होता. त्याला सरासरी सव्वा सात हजाराच्या आसपास भाव मिळाला.
आगामी काळात कापसाची आवक सुरू होणार असून ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात कापसाचे बाजारभाव कसे राहतील याची शेतकऱ्यांना उत्सुकता प्रकल्पाच्या माध्यमातून तेथील तज्ज्ञांनी याविषयी विश्लेषण प्रसिद्ध केले आहे.
कापूस (cotton) हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे जे 'व्हाइट-गोल्ड' (White Gold) म्हणून ओळखले जाते. जागतिक स्तरावर चीन आणि यूएसए नंतर भारत हा कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश असून एकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी २५% वाटा भारताचा आहे.
राष्ट्रीय आयात आणि निर्यातीच्या बाबतीत मागील वर्षाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये आयातीत आणि निर्यातीत वाढ होण्याचा अंदाज आहे. हाच कल जागतिक पातळीवर दिसला असून मागील वर्षीच्या तुलनेत आयात व निर्यातीमध्ये सरासरी ६% वाढ झाली आहे.
USDA-FAS च्या अंदाजानुसार विपणन वर्ष २०२४-२५ मध्ये भारतातील कापूस उत्पादन २५.४ दशलक्ष ४८० Ib bales आहे. शेतकरी कापूस लागवडीचे क्षेत्र डाळी,मका आणि भात यासारख्या उच्च परतावा पिकांकडे वळवतील या अपेक्षेमुळे पेरणी केलेल्या १२.४ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील गाठी मागील वर्षाच्या तुलनेत दोन टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
कापणीच्या क्षेत्रफळाच्या वाढीमुळे 2024/25 मध्ये जागतिक उत्पादन 115.9 दशलक्ष गाठीपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. एकूणच, गेल्या महिन्यात आर्थिक दृष्टीकोन सुधारल्यामुळे 2024/25 विपणन वर्षासाठी जागतिक कापसाच्या मागणीचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक आहे.
ऑक्टोबरमध्ये कसे असतील कापसाचे भाव?
अकोला बाजारपेठेत (Akola APMC) कापसाचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) जास्त आहेत. मागील तीन वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील कापसाच्या किमती पुढील प्रमाणे
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१- रु ७,९३९ प्रति क्विंटल
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ रु ८,७६२ प्रति क्विंटल
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ रु ७,०७५ प्रति क्विंटल
कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष येथील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टो. ते डिसें. २०२४ या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे रु. ७,५०० ते ८,५०० प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी सदर अहवाल हा बाजाराची सद्य:स्थिती व भविष्यकालीन किंमतीविषयक अनुमान दर्शवितो. आंतरराष्ट्रीय किंमती, हवामान, आर्थिक घटक, आणि सरकारी धोरण यामध्ये होणाऱ्या बदलामुळे संभाव्य किंमतीमध्ये बदल होऊ शकतो. परिणामी बाजारातील वास्तविक किंमती या संभाव्य किंमती पेक्षा वेगळ्या असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी या अहवालाचा काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहनही या तज्ज्ञांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष, पुणे
फोन: ०२०-२५६५६५७७, टोल फ्रीः १८०० २१० १७७०