Join us

ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये कापसाचे भाव कसे राहतील? जाणून घ्या अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 3:29 PM

यंदा पावसाचा फटका कपाशीलाही बसला असून अनेक ठिकाणी उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मात्र कापूस लवकरच बाजारात येणार असून काही ठिकाणी कापूस आवक सुरू झाली आहे. जाणून घेऊ या कापूस बाजारभाव.

दिनांक ८ ऑक्टोबर २३ रोजी आर्वी बाजारसमितीत कापसाची १०५ क्विंटल आवक झाली. कमीत कमी भाव ७३००, जास्तीत जास्त ७३५०, तर सरासरी ७३२० रुपये प्रति क्विंटल असे राहिले. दिनांक ७ ऑक्टोबर रोजी खामगाव बाजारसमितीत मध्यम स्टेपलच्या कापसाला सरासरी ६९०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता.

कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे जे व्हाइट गोल्ड म्हणून ओळखले जाते. जागतिक स्तरावर चीन आणि यूएसए नंतर भारत हा कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश असून एकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी 25% वाट भारताचा आहे आहे. राष्ट्रीय आयात आणि निर्यातीच्या बाबतीत मागील वर्षाच्या तुलनेत 2022-23 मध्ये आयातीत 55% वाढ आणि निर्यातीत 23% घट होण्याचा अंदाज आहे.

हाच कल जागतिक पातळीवर दिसला असून मागील वर्षीच्या तुलनेत आयातीत 3.84% वाढ आणि निर्यातीत 1.81% घट झाली आहे, असे निरीक्षण बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्ष, स्मार्ट ॲग्रीक्लचर विभाग पुणे येथील तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

गेल्या वर्षी 14 वर्षामधील नीचांकी उत्पादनावर गेल्यानंतर, भारतातील कापूस पीक 337 लाख गाठी म्हणजे गेल्या वर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत 26 लाख गाठींनी जास्त असल्याचा अंदाज स्मार्टच्या तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

2023-24 मध्ये जागतिक कापूस उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत किरकोळ वाढण्याची अपेक्षा आहे (0.5) टक्के किंवा 600,000 गाठी) ते 115.0 दशलक्ष गाठी युनायटेड स्टेट्समध्ये जास्त उत्पादनाची अपेक्षा तसेच चीन, तुर्कस्तान आणि पाकिस्तान मध्ये कमी उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (स्रोत: USDA-Cotton Outlook)

गेल्या चार महिन्यांपासून अकोला बाजारपेठेत कापसाचे भाव थोडे कमी होत आहेत. मागील तीन वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील कापसाच्या किमती पुढील प्रमाणे आहेत:ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० रु ५२५० प्रति क्विंटल ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ रु ७९३९ प्रति क्विंटल ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ रु. ८७६२ प्रति क्विंटल

ऑक्टोबर ते डिसेंबर अंदाजदरम्यान ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे रु. ७५०० ते ८५०० प्रति क्विंटल राहतील असा अंदाज स्मार्ट प्रकल्पाच्या बाजार जोखीम विभागाच्या तज्ज्ञांनी दिला आहे.

कापसाचे भविष्यातील बाजारभाव जाणून घ्यायचे असतील किंवा आणखी काही शंका असतील तर अधिक माहितीसाठी संपर्कबाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष, पुणेएम.एस.एफ.सी बिल्डींग, २७० भाम्बुर्डा, नारायण एस. बी. मार्ग,सिंबायोसिस कॉलेज, गोखले नगर, पुणे ४११०१६फोन: ०२० - २५६५६५७७, टोल फ्री: १८०० २१० १७७०, ई-मेल: mirmc.smart@gmail.com

कापसाचे बाजारभाव असे होते

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/10/2023
आर्वीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल105730073507320
07/10/2023
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल21660072006900
06/10/2023
सिरोंचा---क्विंटल70650067006600
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल33660072006900
यावलमध्यम स्टेपलक्विंटल109645074106910
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल93680073007100
टॅग्स :कापूसकॉटन मार्केटपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार