भारत हा जगातील सर्वात मोठा तूर उत्पादक तसेच उपभोक्ता देश आहे. भारतातील तूर उत्पादनात महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश राज्यांचा वाटा ६० टक्के पेक्षा जास्त आहे. तूरीच्या बाजारपेठेवर मागील वर्षातील तूर साठा, आयात तसेच चालू वर्षातील उत्पादन यांचा परिणाम होताना दिसतो. केंद्र शासनाने तूर निर्यातीसाठी खुली केली असून तूरीचा आयात कोटा मर्यादित ठेवलेला आहे. विदेशी व्यापार महासंचालनालय (DGFI) ने प्रकाशीत केलेल्या अहवालानुसार तूरीसाठीचे - मुक्त आयात धोरण मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आले आहे.
यासारख्या बातम्यांसाठी जॉईन करा लोकमत ॲग्रोचा व्हॉटस्अप ग्रुप, त्यासाठी इथे क्लिक करा.
यंदाची तुरीची आवक अशी माहे डिसेंबर ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष नोव्हेंबर २०२२-२३ मधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत सारखीच राहिलेली दिसून येत आहे. जानेवारी २०२४ मध्ये १७.१ लाख टन आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत १७.० लाख टन होती.उत्पादनाचा अंदाज असा आहेतूर खरीप पिक असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२३-२४ मध्ये तुरीचे उत्पादन सुमारे ३४.२१ लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी जास्त आहे. तसेच महाराष्ट्रातील २०२२-२३ मधील उत्पादन ९.२ लाख टनांवरून सन २०२३-२४ मध्ये ८.७ लाख टनांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.मागील किंमतींचा आढावाडिसेंबर २०२२ पासून तुरीच्या किंमती वाढत आहेत. गतवर्षीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव जास्त आहेत. मागील तीन वर्षातील लातूरबाजारपेठेतील तुरीच्या एप्रिल ते जून मधील सरासरी किंमती खालीलप्रमाणे:एप्रिल ते जून २०२१: रु. ६,५२५/क्विंटलएप्रिल ते जून२०२२: रु. ६,१६८/क्विंटलएप्रिल ते जून२०२३: रु. ९,१८०/क्विंटलसध्याच्या हंगामासाठी सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (रु. ७०००/क्विंटल) सध्याच्या तुरीच्या किंमती जास्त आहेत.लातूर बाजारातील संभाव्य किंमतीएप्रिल ते जून २०२४ या कालावधीसाठी लातूर बाजारसमितीत तुरीचे संभाव्य दर ८५०० ते १०५००/ प्रति क्विंटल राहतील असा अंदाज आहे. (गेल्या वर्षांच्या तुलनेत चालू वर्षातील आयात जास्त राहील असे गृहीत धरून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे) सदर संभाव्य अंदाज हा FAQ ग्रेड च्या तुरीसाठी आहे.