Join us

Gahu Bajar Bhav : बारामतीच्या सुपे उपबाजारात या शेतकऱ्याच्या खपली गव्हाला मिळाला सर्वाधिक दर.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 10:43 AM

बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गुरुवारी (दि. २४) व सुपे उपबाजार येथे झालेल्या भुसार लिलावामध्ये गहू, खपली, बाजरी या शेतमालाला उच्चांकी दर मिळाला.

बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गुरुवारी (दि. २४) व सुपे उपबाजार येथे झालेल्या भुसार लिलावामध्ये गहू, खपली, बाजरी या शेतमालाला उच्चांकी दर मिळाला.

बारामती मुख्य यार्डमधील आडतदार शिवाजी दादासो फाळके यांच्या आडतीवर शेतकरी विश्वासराव देवकाते, निरावागज यांच्या खपली गव्हाला प्रति क्विंटल रु. ७४०० प्रल्हाद लंगुटे (रा. फलटण) यांच्या गहू या शेतमालाला प्रति क्विंटल ३५०० मिळाला.

तसेच विजय गोलांडे (रा. लोणी) यांच्या बाजरीस प्रति क्विंटल रु. ३३२१ असा उच्चांकी दर बारामतीचे बाजार समितीमध्ये लिलावात मिळाला. सुपे उपबाजार येथे आडतीवर शेतकरी निंबाळकर (रा. शिरसगाव काटा) यांच्या बाजरीस प्रति क्विंटल ३४५१ असा उच्चांकी दर मिळाला.

बारामती बाजार समितीमध्ये बाजरीची आवक फलटण, माण, खटाव या भागामधून येत असून ज्वारी, गहू, मका या व इतर शेतमालाची आवक बारामतीसह इंदापूर, दौंड, फलटण या तालुक्यातून होत आहे.

मुख्य यार्ड व सुपे उपबाजार येथे धान्य ग्रेडिंग मशीन असून त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल स्वच्छ व प्रतवारी करून आणल्यास त्याचा चांगला आर्थिक लाभ शेतकऱ्यांना मिळेल.

समितीचे इंदापूर, दौंड, फलटण या तालुक्यातून होत आहे. मुख्य यार्ड व सुपे उपबाजार येथे धान्य ग्रेडिंग मशीन असून त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा.

शेतकऱ्यांनी आपला शेतमाल स्वच्छ व प्रतवारी करून आणल्यास त्याचा चांगला आर्थिक लाभ आवारात शेतकऱ्यांचा शेतमाल आल्यानंतर प्रथम वजन नंतर लिलाव अशी सुविधा देऊन शेतकऱ्यांना लगेच त्याच दिवशी पेमेंट मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बारामती बाजार आवारातच विक्रीस आणण्याचे आवाहन केले.

बारामती बाजार समितीत हमीभाव खरेदी केंद्रबारामती बाजार समितीमध्ये शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू आहे. मूग, उडीद, सोयाबीन या शेतमालाची ऑनलाइन नाव नोंदणी सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नाव नोंदणी केली नाही त्यांनी नोंदणी करून हमीभाव केंद्राचा फायदा घ्यावा, अशी माहिती समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

टॅग्स :गहूबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबारामतीबाजरी