नुकताच झालेला अवकाळी पाऊस आणि शेतात पाणी नसल्याने त्याचा सर्वाधिक फटका भाजीपाल्यास बसला आहे. बऱ्याच भाजीपाल्याच्या भावात वाढ झाली आहे. तर, काही भाज्या मिळेनाशा झाल्या आहेत.
सध्या लसणाने १६० रुपयांचा आकडा पार केला आहे. अवकाळी पावसचा मोठा फटका भाजीपाला उत्पादक शेतकरी वर्गाला बसला आहे. आता येथून भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टोमॅटोचे भाव कमी झाले असल्याचे बाजारातील चित्र आहे.
अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा फटका त्याचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकरी वर्गाला बसला आहे. कांदा काढून शेतावर ठेवला होता. या पावसात भिजल्याने कांद्याचे वांदे झाले. कांदा भिजल्यामुळे आठ रुपये दराने विकला जात आहे.
टोमॅटोच्या भावावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे चित्र आहे.
टाेमॅटोचे भाव पडले
टोमॅटो १० रुपये प्रति किलो झाला आहे. तर, कांदा ८ रुपये किलो दराने मिळत आहे. तसेच कोथिंबीरही कमी दरानेच बाजारात उपलब्ध होत आहे.
या भाज्यांचे दर वाढले
दोडक्याने शंभरी पार केली आहे. त्या खालोखाल मटकी ८० रुपये प्रति किलो, वांगे ६० रुपये प्रती किलो, ढोबळी मिरची ८० रुपये किलो आहे.
पालेभाज्यांच्या दरात वाढ
दोडका १०० रुपये किलो झाला आहे. वांगे, मिरची, भेंडीही महागली आहे. लसूण १६० रुपये प्रति किलो झाला आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले असून, दरात वाढ झाली आहे.
भाजी विक्रेते म्हणतात....
यावर्षी पाऊसकाळ कमी झाला. परिणामी विहिरींना पाणी नाही. उन्हाळ्यात भाजीपाला पिकविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड असते.-सतीश माळी
यंदा अवकाळी पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. याचा फटका टोमॅटोलाही बसला आहे. -शंकर खताळ