Garlic Market : हिवाळ्याच्या दिवसांत लसणाला ड्रायफ्रूटचा भाव; दर आणखी वाढणार का? वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 10:38 AM
Garlic Market Rate Update : किरकोळ बाजारात सध्या लसणाचा भाव ४०० ते ४५० रुपये प्रति किलोपर्यंत जावून पोहोचला आहे. येणाऱ्या काळात हा भाव आणखी वाढून ५०० ते ६०० रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज लसूण विक्रेत्यांनी वर्तविला आहे. परिणामतः लसणाचा तुटवडा सर्वत्र जाणवत आहे.