राज्यात लसणाचा किलोमागे २०० रुपयांचा भाव आता काहीसा उतरू लागला आहे. राज्यात आज दिवसभरात १ हजार ८९५ क्विंटल लसणाची आवक झाली. यावेळी लोकल व हायब्रीड लसूण बाजारात विक्रीसाठी दाखल झाला होता. शेतकऱ्यांना क्विंटलमागे आता ८००० ते १६००० रुपयांचा सर्वासाधारण भाव मिळाला. किरकोळ बाजारात लसणाला किलोमागे साधारण १२० ते १६० रुपये भाव मिळत आहे.
पुण्यात किलोमागे द्यावे लागताहेत..
पुण्यात आज १०७६ क्विंटल लसणाची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना १२ हजार ७५० रुपयांचा भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात नागरिकांना किलोमागे १२० ते १३० रुपयांचा भाव मिळत आहे.
क्विंटलमागे भाव कुठवर पोहोचला?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४५ क्विंटल लसणाला १२००० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे. तर अमरावती, ठाणे, अकोला या बाजारसमित्यांमध्ये क्विंटलमागे मिळणारा भाव १५ हजार ते २० हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे.
कमीत कमी भाव घसरला
ठाण्यात हायब्रीड लसणाला कमीत कमी १० हजार रुपये मिळत असून सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर बाजारसमितींमध्ये लसणाला ८ ते १० हजार रुपयांचा कमीत कमी भाव मिळत आहे.
पहा कुठे कशी आवक झाली?
जिल्हा | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|
27/05/2024 | |||||
अहमदनगर | --- | 23 | 6000 | 9000 | 8000 |
अकोला | --- | 347 | 12000 | 16000 | 15000 |
अमरावती | लोकल | 270 | 10000 | 20000 | 15000 |
छत्रपती संभाजीनगर | --- | 45 | 8000 | 15000 | 12000 |
नागपूर | लोकल | 1 | 16000 | 16000 | 16000 |
पुणे | लोकल | 1076 | 9000 | 16500 | 12750 |
सांगली | लोकल | 120 | 9000 | 20000 | 14500 |
सोलापूर | --- | 10 | 8000 | 12000 | 10000 |
ठाणे | हायब्रीड | 3 | 10000 | 20000 | 15000 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 1895 |