कांद्याचे दर घसरणीला लागलेले असताना, लसणाचे दर मात्र वाढत आहे. उत्पादनात घट झाल्याने लसूण महागला आहे. पुणे बाजारसमितीत आज दिनांक २५ डिसेंबर रोजी लसणाला कमीत कमी १४ हजार, तर सरासरी २० हजाराचा भाव मिळाला, तर अकलुज बाजारसमितीत सरासरी १८ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. थोडक्यात घाऊक बाजारात सध्या लसणाला दीडशे ते अडीचशे रुपये प्रति किलो भाव मिळत आहे.
कांद्याची आवक घटली, आजचा कांदा बाजारभाव जाणून घ्या?
उत्तर प्रदेशात मात्र लसणाला किलोमागे सरासरी ३०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्याने सध्या अनेक भाजीविक्रेते आणि व्यापाऱ्यांना साठवलेल्या लसणाची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. तरीही चोरटे लसणावर हात साफ करताना दिसत आहे. अशीच चोरीची घटना महोबा जिल्ह्यातील बाजारसमितीत घडली आहे. येथील घाऊक कांदा-लसूण व्यापारी मोहम्मद इम्रान यांनी सकाळी नेहमीप्रमाणे आपले दुकान उघडले तर त्यांना धक्काच बसला. दुकानातील लसणाच्या ८ गोण्या गायब झालेल्या होत्या. बाजारभावाप्रमाणे या लसणाची किंमत सुमारे ६० हजार रुपये इतकी आहे.
कणगी' म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी, साठवणुकीच्या पद्धती कालबाह्य
महोबातील किरतसागर भागात घाऊक बाजारात ही घटना घडली. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटवून लसूण लंपास केल्याचे दिसून आले. चोरीनंतर संबंधित व्यापाऱ्याने तातडीने पोलिसांत तक्रार दिली असून आता येथील कोतवाली पोलिस लसूणचोराचा कसून शोध घेत असल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने दिले आहे. या चोरीनंतर परिसरातील व्यापारी आणि शेतकरीही सतर्क झाले असून लसूण सुरक्षित ठेवण्यासाठी ते आता उपाय करत असल्याचे समजते.