हिंगोली येथील बाजारपेठेत पंधरवड्यापासून आंब्यांची आवक वाढली असून, सध्या लंगडा, दशेरी, बादाम ७० ते ८० रुपये किलो तर गावरान आंबा १०० रुपये किलो प्रमाणे विकला जात आहे. गावरानची आवक कमी होत असल्याने हा इतर आंबे भाव खात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच आंबाबाजारात येऊ लागतो. सध्या आंब्यांचा मौसम सुरू असून, विविध प्रकारच्या कलमी आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे उपलब्ध झालेल्या आंब्यासह व्यापारी नांदेडसह इतर जिल्ह्यातून आंबे विक्रीसाठी आणत आहेत.
सध्या आंब्यांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली असून, शहरातील महात्मा गांधी चौकात सकाळपासून सायंकाळपर्यंत आंबे खरेदी करताना पाहावयास मिळत आहे. बाजारात दशेरी, लंगडा, तोतापुरी, हापूस, बादाम, गावरानसह इतर विविध आंबे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
गावरान आंब्याची चव महागली
वाढती वृक्षतोड, पावसाचे कमी प्रमाण यामुळे गावरान आंब्याच्या झाडांची संख्या कमी झाली आहे. अनेक वर्षापासूनची जुनी झाडे वाळली, काही तोडली गेली यामुळे गावरान आंब्याच्या झाडांची संख्या दुर्मीळ झाली आहे.
आंध्र प्रदेश, पश्चिम महाराष्ट्रातून आंब्याची आवक
हिंगोलीच्या बाजारात सध्या स्थानिक आंब्यासह आंध्र प्रदेश, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून आंब्याची आवक होत आहे. त्या भागातून व्यापारी आंबा विक्रीसाठी आणत आहेत. . हा आंबा आणण्यासाठी वाहतुकीचा स्वर्च स मोठा लागत असल्याने किरकोळ दरात आंब्याचे भाव वधारत आहेत. येणाऱ्या दिवसांत आवक वाढण्याची शक्यता असून, त्यानंतर भाव कमी होतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील विविध बाजार समितीमधील आंब्यांची आवक आणि दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
15/05/2024 | ||||||
श्रीरामपूर | --- | क्विंटल | 140 | 5000 | 11000 | 8000 |
सांगली -फळे भाजीपाला | हापूस | क्विंटल | 1413 | 1300 | 6500 | 3900 |
मुंबई - फ्रुट मार्केट | हापूस | क्विंटल | 5125 | 9000 | 20000 | 14500 |
मुंबई - फ्रुट मार्केट | लोकल | क्विंटल | 8798 | 6000 | 10000 | 8000 |
राहता | लोकल | क्विंटल | 3 | 2000 | 4500 | 3200 |
कामठी | लोकल | क्विंटल | 5 | 1500 | 2500 | 2000 |
हेही वाचा : स्पर्धा परीक्षा सोडून माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट