संजय लव्हाडे
साखरेतील विक्रमी तेजी, सोने-चांदीच्या दरातील पडझड, नाफेडकडे तूर विक्री करण्यास शेतकऱ्यांची अनुत्सुकता आणि ग्राहकांनी बाजाराकडे फिरवलेली पाठ यामुळे मागील आठवड्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढवली आहे.
जालना जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांपैकी केवळ २० शेतकऱ्यांनी आतापर्यंत नाफेडकडे तूर विक्रीसाठी नोंदणी केली हे उल्लेखनीय आहे.
मार्च महिन्याचा कोटा जाहीर होताच ठोक व्यापाऱ्यांनी अधिकचे गाडी भाडे देऊन साखर ताबडतोब उचलली. परिणामी, साखरेच्या दरात क्विंटलमागे शंभर रुपयांची तेजी आली असून, भाव ४२०० ते ४३०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
खुल्या बाजारातील तुरीचे दर आणि शासकीय हमी केंद्रातील तुरीच्या दरामध्ये अधिक अंतर नाही. यातून शासकीय जाण्यासाठी उत्सुक केंद्राकडे शेतकरी नाहीत. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पुढील काळात तुरीचे दर वाढतील, अशी अपेक्षा आहे.
शासकीय हमी केंद्राकडे तूर विक्रीकरिता गेली नाही. जालना बाजारपेठेत तुरीची आवक दररोज तीन हजार पोती इतकी होत असून, पांढरी तूर ६००० ते ७५००, लाल तूर ६६५१ ते ७४५१ आणि काळ्या तुरीचे दर ९५०० ते १०५०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
बाजार दर
गहू - २५०० ते ४५००ज्वारी - २००० ते ४०००बाजरी - २३०० ते ३३००मका - १५०० ते २२००उडीद (काळी) - ५८००राजमा - ६७०० ते ७०००सोयाबीन - ३६०० ते ४०००
गावरान हरभऱ्याची आवक
• बाजारात बाजारात मोठा काबुली (डॉलर) हरभऱ्याची आवक (दररोज १७५ ते २०० पोती) सुरू झाली आहे. आवक मागील सहा दिवसात वाढली असून, दर ५८०० ते ८५०० रुपये प्रति क्विंटल व सरासरी ७२०० रुपये प्रति क्विंटल असा मिळाला आहे.
• मोठा काबुली हरभरा जालन्यात डॉलर किंवा मॅक्सिकन या नावाने बाजारात ओळखला जातो. गावरान हरभऱ्याची आवक दररोज दहा हजार पोती इतकी असून, भाव ५००० ते ५४०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
• शुक्रवारी बाजारात सोन्याचा दर पाचशे रुपयांनी कमी होऊन ८५ हजार रुपये प्रति तोळा असा झाला. सोन्याने दर आठवड्यात त्यापूर्वीचा रेकॉर्ड मोडला. जालना बाजारपेठेत चांदीचा दर ९५ हजार रुपये प्रति किलो असा आहे.