नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये नव्या हळदीची आवक सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी हळदीला या वर्षातील सर्वोच्च १५ हजार ३७७ रुपये भाव मिळाल्याने हळद उत्पादकांना 'अच्छे दिन' येत आहेत.
नवीन मोंढ्यात ७ मार्च रोजी झालेल्या बिटात हळदीला या वर्षातील सर्वोच्च प्रतिक्विंटल १६ हजार ६९५ रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे यंदा हळद उत्पादकांना 'अच्छे दिन' येत असल्याचे दिसून येते.
मागील काही दिवसांपासून हळद काढणीला सुरुवात झालेली असून, यावर्षी पाडव्याच्या मुहूर्तापूर्वीच हळद विक्रीसाठी बाजारात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी लवकर लागवड केल्यामुळे काढणीही लवकर झाली.
गुरुवार, ७ मार्च रोजी झालेल्या लिलाव बाजारात हळदीला जास्तीत जास्त १६,६९५, किमान १२,३०० तर सरासरी १४,५०० रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला.
पंधरा दिवसांपासून दरात वाढजानेवारी महिन्यात नांदेडमार्केट यार्डात हळदीचे भाव दहा हजार रुपयांच्या खाली आले होते; पण त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे.