Lokmat Agro >बाजारहाट > हळदीला अच्छे दिन.. यंदा शेतकऱ्यांना मिळतोय दुप्पट बाजारभाव

हळदीला अच्छे दिन.. यंदा शेतकऱ्यांना मिळतोय दुप्पट बाजारभाव

Good day for turmeric.. this year farmers are getting double the market price | हळदीला अच्छे दिन.. यंदा शेतकऱ्यांना मिळतोय दुप्पट बाजारभाव

हळदीला अच्छे दिन.. यंदा शेतकऱ्यांना मिळतोय दुप्पट बाजारभाव

या वर्षी देशभर हळदीला चांगला भाव मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही हळद १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात असून, यामध्ये अजून वृद्धी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या वर्षी देशभर हळदीला चांगला भाव मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही हळद १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात असून, यामध्ये अजून वृद्धी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नामदेव मोरे
नवी मुंबई : या वर्षी देशभर हळदीला चांगला भाव मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईबाजार समितीमध्येही हळद १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात असून, यामध्ये अजून वृद्धी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गतवर्षी हळदीला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले. गतवर्षी मुंबई बाजार समितीमध्ये हळद प्रतिकिलो ९० ते १३० रुपये किलो दराने विकली जात होती. यावर्षी हेच दर १५० ते २०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यामध्ये लग्नसराई, चटणी तयार करणे यासाठी हळद व हळकुंडांना मागणी वाढते. यामुळे पुढील दोन महिने हळदीचे दर तेजीत राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबई बाहेरील बाजारपेठांमध्येही हळदीला चांगला दर मिळत असल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सर्वाधिक उत्पादन भारतात
२०२२-२३ मध्ये ११.६१ लाख टन हळदीचे उत्पादन झाले होते. जगातील उत्पादनापैकी ७५ ते ८० टक्के उत्पादन फक्त भारतामध्ये होते. युएई, युएसए, मलेशिया, बांगलादेश व इतर देशात निर्यात केली जाते. देशात ३० पेक्षा जास्त जातीच्या हळदीची लागवड केली जाते.

तामिळनाडूसह महाराष्ट्र आघाडीवर
देशात तामिळनाडू व महाराष्ट्रात हळदीचे सर्वाधिक उत्पादन होते. तेलंगणा, कर्नाटकमध्येही मोठ्या प्रमाणात हळद लागवड केली जाते. महाराष्ट्रात सातारा, सांगली, हिंगोली परिसरात हळदीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

गतवर्षी हळदीचे दर कमी होते. यावर्षी हळदीला समाधानकारक भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. - अमरीश बरोत, व्यापारी मसाला मार्केट

Web Title: Good day for turmeric.. this year farmers are getting double the market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.