हरभरा हे भारतातील मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि उपभोग असणारे डाळवर्गीय पिक आहे. जागतिक पातळीवर एकूण डाळ उत्पादनापैकी २० टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, तुर्की, म्यानमार, पाकिस्तान आणि इथिओपियासह सहा देश जागतिक हरभरा उत्पादनात सुमारे ९० टक्के योगदान देतात.
भारत हा हरभऱ्याचा प्रमुख उत्पादक देश असून जगातील एकूण उत्पादनात भारताचा वाटा सुमारे ७०-७५ टक्के आहे. भारतातील एकूण डाळ उत्पादनापैकी ४०-५० टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे. देशभरात हरभऱ्याचा वापर डाळ व बेसन या दोन्ही स्वरूपात केला जातो.
हरभरा हे रब्बी पिक असून त्याची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर व काढणी मार्च ते एप्रिल या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२२-२३ मध्ये हरभऱ्याचे उत्पादन सुमारे १३६.३ लाख टन होण्याची शक्यता आहे जे मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास सारखेच असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्रातील २०२१-२२ मधील उत्पादन २७.२ लाख टनांवरून सन २०२२-२३ मध्ये ३६.३९ लाख टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये निर्यात वाढलेली आहे तर आयात कमी झालेली आहे
मार्च ते मे हा हरभऱ्याचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष फेब्रुवारी २०२३-२४ मधील हरभऱ्याची आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी झालेली दिसून येत आहे. फेब्रुवारी २०२४ (१५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत) मध्ये ती ०.५ लाख टन इतकी आहे.
जी मागील वर्षी याच कालावधीत २.५ लाख टन इतकी होती. ऑक्टोबर २०२२ पासून हरभऱ्याच्या किंमती वाढत आहेत. ऑगस्ट २०२३ नंतर त्या सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त आहेत.
मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील हरभऱ्याच्या एप्रिल ते जून मधील सरासरी किंमती खालीलप्रमाणे
एप्रिल ते जून २०२१ - रु. ४,८४४/क्विंटल
एप्रिल ते जून २०२२ - रु. ४,५२५ /क्विंटल
एप्रिल ते जून २०२३ - रु. ४,८१०/क्विंटल
(स्त्रोत: Agmarknet)
सध्याच्या रब्बी हंगामासाठी हरभऱ्याची सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत रु. ५,३३५/क्विंटल आहे.
अधिक माहितीसाठी
बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष, पुणे, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प
एम.एस.एफ.सी बिल्डींग, २७० भाम्बुर्डा, नारायण एस.बी.मार्ग, सिंबायोसिस कॉलेज, गोखले नगर, पुणे ४११०१६
फोनः ०२०-२५६५६५७७, टोल फ्रीः १८०० २१० १७७०
अधिक वाचा: Honeybee Pollination मधमाशा परागीभवन करतात म्हणजे नक्की काय करतात?