जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यात यंदा सर्वाधिक १३,५३१ हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत २० ते २५ टक्क्यांहून अधिकची पेरणी करण्यात आली.
गेल्या दहा दिवसांपासून रब्बी हंगाम सोंगणीच्या कामाला सुरुवात झाली असून, हरभराही काढला जात आहे. यंदा जालना येथील बाजारपेठेत हरभन्याला ५४०० रुपये भात आहे. तर मागील वर्षी ६५०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना क्विंटलमागे एक हजारांचा
फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेपोटी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे.
यंदा परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे अतोनात नुकसान झाले. रबी हंगामातून चांगले उत्पन्न मिळेल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी डिसेंबरपर्यंत ३० हजार क्षेत्रावर रब्बीची पेरणी केली होती.
जानेवारी महिन्यात दोन अवकाळी पाऊस झाल्याने रब्बीला फायदा झाला. त्यामुळे हरभरा पीकही जोमात आले आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादूर्भाव झाला होता.
मात्र, शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या महागड्या औषधींची फवारणी केली होती. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत २० ते २५ टक्क्यांहून अधिक हरभऱ्याची पेरणी करण्यात आली. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रब्बी पिकांकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. मात्र, यंदा पाऊस चांगला असल्यामुळे सर्वाधिक रब्बीवर जोर देण्यात आला आहे.
५४०० रुपये यंदा हरभऱ्याला मिळतोय भाव
जालना येथील बाजारपेठेत सध्या हरभन्याला ५४०० रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे. गेल्या वर्षी ६५०० रुपये भाव मिळाला होता. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा हरभरा पिकाकडे कल वाढला आहे. मात्र, आता भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर निघत आहे.
जाफराबाद तालुक्यात १३ हजार ५३१ हेक्टरवर पेरणी
● यंदा चालू रब्बी हंगामात १३,५३१ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पेरा २० ते २५ टक्क्यांनी वाढला आहे.
● आता हे पीक जोमात आले असून, शेतकऱ्यांकडून सोंगणी करून थेट बाजारपेठेत दाखल केले जात आहे. मात्र, बाजारपेठेत केवळ ५४०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
बाजारपेठेत आवक सुरू
सध्या बाजारपेठेत हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असून, दरही घसरले आहेत. बाजारात नवीन हरभरा येण्यास सुरुवात झाली असून, पुढील महिनाभरात मोठ्या प्रमाणात आवक वाढण्याची शक्यता आहे. सध्या ५००० ते ५४०० रुपये भाव मिळत आहे. हे भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे. - संजय लव्हाडे, व्यापारी.
दरवाढ होणे आवश्यक
गतवर्षीपेक्षा यंदा हरभन्याचा पैरा अधिक वाढला आहे. सध्या हरभन्याला कमी दर मिळत आहे. शासनाने किमान गेल्या वर्षीप्रमाणे तरी खरेदी करावा. तेव्हाच शेतकऱ्यांची संकटातून मुक्तता होईल. - विजय साळवे, शेतकरी.
वेळेवर मजूर मिळत नसल्याने हार्वेस्टरला पसंती
गेल्या दहा दिवसांपासून रब्बी हंगाम सोंगणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, वेळेवर मजूर मिळत नसल्याने काही शेतकरी हार्वेस्टरला पसंती देत असल्याचे दिसत आहे.