Lokmat Agro >बाजारहाट > Grape Export द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा दबदबा; देशात नंबर एकवर

Grape Export द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा दबदबा; देशात नंबर एकवर

Grape Export Maharashtra dominates in grape export; Number one in the country | Grape Export द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा दबदबा; देशात नंबर एकवर

Grape Export द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा दबदबा; देशात नंबर एकवर

एकट्या महाराष्ट्रातून एप्रिलपर्यंत १ लाख ८२ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. तर संपूर्ण देशातून जानेवारीपर्यंत २ लाख ४० हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. महाराष्ट्रातून द्राक्ष व डाळिंबाची निर्यात वरच्या वर वाढत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अरुण बारसकर
सोलापूर : महाराष्ट्रातील सुपीक मातीत बळीराजाच्या कष्टातून उत्पादित झालेल्या महाराष्ट्रातील चवदार द्राक्षांना सातासमुद्रापार मागणी असून संपूर्ण भारतात द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्र आघाडीवर आहे.

एकट्या महाराष्ट्रातून एप्रिलपर्यंत १ लाख ८२ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. तर संपूर्ण देशातून जानेवारीपर्यंत २ लाख ४० हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. महाराष्ट्रातून द्राक्ष व डाळिंबाची निर्यात वरच्या वर वाढत आहे.

डाळिंबाची निर्यात तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातूनच सर्वाधिक होते. द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. नाशिक, सांगली नंतरच्या दोन-तीन जिल्ह्यांत सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे.

भारतातून तसेच महाराष्ट्रातून गतवर्षीपेक्षा यंदा द्राक्ष निर्यात कमीच झाली आहे. भारतातून झालेल्या द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, मागील वर्षीपेक्षा महाराष्ट्रातून व भारतातून द्राक्ष निर्यात कमी झाली आहे.

युरोपियन देशांत ज्या मार्गावरून दरवर्षी निर्यात होते तो मार्ग यावर्षी बंद होता. भारतातून जानेवारीपर्यंत दोन लाख ३९ हजार मेट्रिक टन, तर एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातून एक लाख ८१ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाल्याचे पणन कार्यालयाकडून सांगण्यात आले.

आकडेवारी मेट्रिक टनात व जानेवारी २४ पर्यंत

राज्य२०२२-२३२०२३-२४
महाराष्ट्र१,७५,२३४१,६५,७३०
प. बंगाल७६,९५५५०,४३०
उत्तर प्रदेश८,३०७५,३६१
बिहार२,९४७४,३३२
ओरिसा४,३४५३,१७८
उत्तरांचल२४१२९५

'अवकाळी'ने बसला मोठा फटका
नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. निर्यातक्षम द्राक्षाला गुणवत्ता राहिली नाही. त्यामुळे व नेहमीचा निर्यातीचा मार्ग बंद असल्याने दूर अंतरावरून जहाज गेले. नाताळ काळात द्राक्ष पोहोच न झाल्याने दरही मिळत नसल्याने निर्यात घटल्याचे सांगण्यात आले.

युरोपियन देशांत नेहमीच्या मार्गावरून कंटेनर वाहतूक खर्च २२०० ते २३०० डॉलर इतका येतो. मार्ग बदलल्याने हाच खर्च ५२०० ते ५३०० डॉलर इतका झाला. याशिवाय नव्या मार्गावरून द्राक्ष उशिराने पोहोचत होती. वाढलेला वाहतूक खर्च परवडत नसल्याने निर्यात घटली. - कैलास मोते, संचालक, फलोत्पादन महाराष्ट्र

अधिक वाचा: Mango Export पॅलेस्टियन समुद्री चाच्यांनी समुद्रावर कब्जा मिळवल्यामुळे समुद्रमार्गे होणारी आंबा निर्यात ठप्प

Web Title: Grape Export Maharashtra dominates in grape export; Number one in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.