Join us

Grape Market द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात; प्रतिकिलो कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 2:58 PM

जत पूर्व भागातील तिकोंडी परिसरातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या द्राक्षला प्रतिकिलो दर ३० ते ४० रुपये इतका दर आहे. अनुकूल हवामानामुळे द्राक्षबागा चांगले आल्या होत्या.

दरीबडची : जत पूर्व भागातील तिकोंडी परिसरातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या द्राक्षला प्रतिकिलो दर ३० ते ४० रुपये इतका दर आहे. अनुकूल हवामानामुळे द्राक्षबागा चांगले आल्या होत्या.

यावर्षी तर किमान चांगला भाव मिळेल, अशी आशा बाळगून होता. फेब्रुवारी मार्चमध्ये द्राक्षला चांगला दर मिळत होता. परंतु वळीव पावसाने द्राक्षाचा दर कमी झाला आहे. बागायतदार संकटात सापडला आहे.

पूर्व भागातील तिकोंडी परिसरातील शेतकरी द्राक्ष बागेचे डिसेंबर महिन्यात मागास छाटणी घेतात. उत्पादन मार्केटिंगसाठी घेतात. एप्रिल-मे महिन्यात विक्री केली जाते. एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारा या संकटाचा सामना करावा लागतो हा हंगाम जोखमेचा समजला जातो.

काही वेळेला द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वाढत्या उन्हाने द्राक्षात साखरेचे प्रमाण अधिक असते. वजन जास्त भरते. बाजारात द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यावेळी द्राक्षांना बाजारात चांगली मागणी असते.

गेल्यावर्षी मे महिन्यात द्राक्षांना ५० ते ६० रुपये किलो भाव मिळला होता. एप्रिल-मे महिन्यात विक्री करण्यासाठी येणाऱ्या द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. द्राक्ष बागेसाठी महागडी औषधे, रासायनिक खत, मजुरी, मशागतीसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.

तिकोंडीतील बागायतदार धाडस करुन बाग आणतात. व्यापारी दृष्टिकोनातून त्यांच्या घडाची रचना केलेली असते. बागेत थिनिंगसाठी लाखो रुपये खर्च केलेले असतात. जेणेकरून पाऊस झाला तरीसुद्धा घडात पाणी साचू नये. यासाठी घड विरळ केलेले असतात. यासाठी मशागतीचा मोठा खर्च करतात.

टॅग्स :द्राक्षेबाजारसांगलीशेतकरीपीकमार्केट यार्ड