Lokmat Agro >बाजारहाट > राज्यातील द्राक्षांना पाश्चिमात्त्य देशांची पसंती यंदा किती झाली निर्यात

राज्यातील द्राक्षांना पाश्चिमात्त्य देशांची पसंती यंदा किती झाली निर्यात

Grapes of the state are preferred by Western countries. How much was exported this year? | राज्यातील द्राक्षांना पाश्चिमात्त्य देशांची पसंती यंदा किती झाली निर्यात

राज्यातील द्राक्षांना पाश्चिमात्त्य देशांची पसंती यंदा किती झाली निर्यात

राज्यात पार पडलेल्या द्राक्ष हंगामात उच्चांकी द्राक्ष निर्यात झाली आहे. जगभरात ५० देशांना राज्यातून ३ लाख २४ हजार ४४१ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

राज्यात पार पडलेल्या द्राक्ष हंगामात उच्चांकी द्राक्ष निर्यात झाली आहे. जगभरात ५० देशांना राज्यातून ३ लाख २४ हजार ४४१ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सतीश सांगळे
कळस : राज्यात पार पडलेल्या द्राक्ष हंगामात उच्चांकी द्राक्ष निर्यात झाली आहे. जगभरात ५० देशांना राज्यातून ३ लाख २४ हजार ४४१ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ७२ हजार टनांनी निर्यातीत वाढ झाली आहे.

फलोत्पादन विभागाच्या माहितीनुसार, यंदा देशातून अमेरिका, ब्रिटन, युरोपीय देशांसह जगभरातील एकूण पन्नास देशांना ३४.६१ कोटी रुपये किमतीची सुमारे ३ लाख ४३ हजार ९८२ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

एकूण निर्यातीत राज्याचा वाटा ९६ टक्के असून, राज्यातून ३३.९५ कोटी रुपये किमतीच्या ३ लाख २४ हजार ४४१ टन द्राक्षांची निर्यात सुरू झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ७२ हजार टनांनी निर्यातीत वाढ झाली आहे.

मागील वर्षाच्या द्राक्ष हंगामात देशातून २५.४३ कोटी रुपये किमतीची २ लाख ६७ हजार ९५० टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यांपैकी राज्यातून २४.८७ कोटी रुपये किमतीची २ लाख ५२ हजार ०५१ टन द्राक्षांची निर्यात झाली होती.

दरवर्षी सरासरी अडीच लाख टन द्राक्ष निर्यात होते. यंदा निर्यातक्षम द्राक्षांची उपलब्धता चांगली होती. दरही चांगला मिळाला. त्यामुळे उच्चांकी निर्यात झाली आहे. वाहतुकीच्या दरातही वाढ झाली होती. तरीही युरोपला चांगली निर्यात झाली आहे. वाहतुकीत अडथळे नसते, तर यंदा द्राक्ष निर्यात साडेतीन लाख टनांवर गेली असती.

खर्चात मोठी वाढ, तरीही निर्यात
-
इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धामुळे समुद्रातून होणारी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे आफ्रिकेला वळसा घालून वाहतूक करावी लागली. त्यामुळे द्राक्ष निर्यातीच्या खर्चात मोठी वाढ झाली होती. तरीही अमेरिका आणि युरोपला यंदा उच्चांकी निर्यात झाली.
- यंदा भारतातून गेलेली जहाजे प्रामुख्याने नेदरलँडच्या किनारपट्टीवर दाखल झाली. तिथून गरजेनुसार रस्तामार्गे संपूर्ण युरोपात द्राक्ष वाहतूक झाली.
- यंदा युरोपला १ लाख ३२ हजार टन निर्यात झाली. मागील वर्षी युरोपला ८३ हजार टन द्राक्ष निर्यात झाली होती. युरोपला होणाऱ्या निर्यातीतही ४९ हजार टनांनी वाढ झाली आहे.

यंदाच्या द्राक्ष निर्यातीचे आकडे (आकडे टनांमध्ये)
३,४३,९८२ देशातून झालेली निर्यात
३,२४,४४१ राज्यातून झालेली निर्यात
१,३२,००० युरोपला झालेली निर्यात

निर्यातीत दरवर्षी वाढ होतच असते. गेल्यावर्षी द्राक्ष पिकाला रंग, आकार व गोडी वाढण्यास पोषक वातावरण होते. त्यामुळे निर्यातीत मोठी वाढ झाली. उत्तम गुणवत्ता, एकाच आकारमानाची फळे, दर्जेदार पॅकेजिंग आणि अन्न सुरक्षा नियमाचे कोटेकोर पालन यामुळे वाव मिळाला. शेतकऱ्यांना निर्यात प्रोत्साहनासाठी द्राक्ष बागायतदार संघ नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. - भारत शिंदे, पुणे विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

Web Title: Grapes of the state are preferred by Western countries. How much was exported this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.