Join us

Green Chilli Market मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; उत्पादन कमी, तरी अपेक्षित भाव मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 9:51 AM

यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली आहे. परंतु, सतत सुरू असलेला पाऊस व पिकावर आलेला अज्ञात रोगामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात मिरचीने पाणी आणले आहे. लागवड मोठ्या प्रमाणात झाली असली तरी भाव योग्य मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे.

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यामधील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली आहे. परंतु, सतत सुरू असलेला पाऊस व पिकावर आलेला अज्ञात रोगामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात मिरचीने पाणी आणले आहे. लागवड मोठ्या प्रमाणात झाली असली तरी भाव योग्य मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

मिरचीच्या झाडांची पाने पिवळी पडून कोकडा पडून नुकसान होत आहे. मिरची पिवळी पडून खराब होत आहे. तालुक्यातील जवळपास १३०० हेक्टरपेक्षा जास्त मिरचीचे लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला मिरची लागवड चांगल्याप्रकारे उगवण होऊन उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. लागवड करण्यात आलेल्या क्षेत्रापैकी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रात घट झाली आहे.

यासोबतच ठिबक, मल्चिंग पेपर, महागड्या औषधी असा खर्चही यावर्षी शेतकऱ्यांनी केला. शेतकरी औषध व इतर प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे; परंतु त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी होताना पाहायला मिळत आहे. रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरण असल्याने विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे खर्च वाढतच चालला आहे. केलेला खर्चही पदरी पडतो की नाही, अशी चिता शेतकऱ्यांना सतावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पंचनामे करण्याची मागणी

वातावरणात बदल, अतिवृष्टी किंवा इतर कारणामुळे सोयाबीन, कापूस यासह अनेक पिकांचे पंचनामे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केले जातात. त्यानंतर मदतही शेतकऱ्यांना दिली जाते. परंतु, मिरची पिकाला विमा मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाचे मिरची पिकाकडे दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांना मिरची पिकावर केलेला खर्चसुद्धा निघत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे इतर पिकांप्रमाणे कृषी विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे. - माणिक पंडित, मिरची उत्पादक, जानेफळ पंडित.

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील मिरची आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/07/2024
कोल्हापूर---क्विंटल59200060004200
पुणे-मांजरी---क्विंटल8300050004000
जुन्नर - नारायणगाव---क्विंटल16850050003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल93140016001500
खेड-चाकण---क्विंटल265300040003500
श्रीरामपूर---क्विंटल18100025002000
भुसावळ---क्विंटल7300045004000
विटा---क्विंटल10250043004000
सातारा---क्विंटल47300040003500
परांडा---नग3300300300
राहता---क्विंटल14200030002500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल14452050004840
अकलुजज्वालाक्विंटल15200040003500
जळगावलवंगीक्विंटल36250030002700
सोलापूरलोकलक्विंटल77200035002500
जळगावलोकलक्विंटल62150020001700
धाराशिवलोकलक्विंटल12220055003850
पुणेलोकलक्विंटल446200035002750
पुणे- खडकीलोकलक्विंटल2400040004000
पुणे-मोशीलोकलक्विंटल156300050004000
मुंबईलोकलक्विंटल1367300050004000
वडगाव पेठलोकलक्विंटल60300045003800
मंगळवेढालोकलक्विंटल11200058003500
रामटेकलोकलक्विंटल10400050004500
कामठीलोकलक्विंटल5450055005000
हिंगणालोकलक्विंटल3350050004250

हेही वाचा - Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी

 

टॅग्स :बाजारमिरचीशेतकरीशेतीजालनामराठवाडाशेती क्षेत्र