Join us

Groundnut Market हिंगोलीच्या मोंढ्यात ८०० क्विंटल भुईमूग विक्रीला; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 9:56 AM

हिंगोली येथील मोंढ्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा भुईमुगाची आवक वाढली. मे, जूनमध्ये सरासरी एक ते दीड हजार क्विंटलची आवक होत होती. ६ ते ६ हजार ५०० रुपये क्विंटलने भुईमुगाची विक्री झाली. मागील पंधरवड्यात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या हाती घेतल्याने मोंढ्यातील आवक मंदावली होती.

हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात गुरुवारी ८०० क्विंटल भुईमूग विक्रीसाठी आला होता. या भुईमुगाला सरासरी ६ हजार ३८० रुपयांचा भाव मिळाला.

हिंगोली येथील मोंढ्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा भुईमुगाची आवक वाढली. मे, जूनमध्ये सरासरी एक ते दीड हजार क्विंटलची आवक होत होती. ६ ते ६ हजार ५०० रुपये क्विंटलने भुईमुगाची विक्री झाली. मागील पंधरवड्यात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या हाती घेतल्याने मोंढ्यातील आवक मंदावली होती.

आता मात्र बहुतांश भागातील पेरणीचे काम अटोपल्याने शेतकरी भुईमुगास तूर, सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत.

गुरुवारी ८०० क्विंटल भुईमूग विक्रीसाठी आला होता. किमान ६ हजार १०० ते ६ हजार ६६० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला, तर सोयाबीनची आवक ६०० क्विंटल झाली होती. सरासरी ४ हजार २२७ रुपयांनी विक्री झाली; परंतु सोयाबीनला मिळत असलेल्या पडत्या दरामुळे शेतकऱ्यांत निराशा व्यक्त होत होती.

तुरीला दरवाढीची चमक...

गत दोन वर्षांपासून तुरीला समाधानकारक भाव मिळत असला तरी उत्पादनात मात्र प्रचंड घट होत आहे. सध्या तुरीला दरवाढीची चमक मिळाली असून, १० हजार ९०० ते ११ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. ११ जुलै रोजी मोंढ्यात ८१ क्विंटल तुरीची आवक झाली होती. सध्या भाव चांगला मिळत असला तरी विक्रीसाठी तूर उपलब्ध नाही. त्यामुळे भाववाढीचा फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - Success Story आत्महत्या करायला निघालेला मराठवाड्यातील तरुण; आज आहे चार चाकीत फिरणारा प्रगतीशील शेतकरी

टॅग्स :बाजारशेतकरीशेतीशेती क्षेत्रमार्केट यार्डमार्केट यार्डहिंगोलीविदर्भमराठवाडा