भुईमूग दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असतांना दरात झालेल्या घसरणीभुळे शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. यातून शेतमालाचा बाजार चांगलाच हादरला आहे. गतवर्षी यवतमाल जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवर उन्हाळी भुईमुगाची लागवड केली होती. दरवर्षी पेक्षा गतवर्षी भुईमुगाचे क्षेत्र वाढलेले आहे.
यावेळी वातावरणामुळे भुईमुगाच्या उत्पादनात वाढ झाली. अशावेळी शेतकऱ्यांना चांगले दर मिळणे अनपेक्षित होते. यामुळे शेतकऱ्यांनी भुईमूग राखून ठेवला होता.
परंतु भुईमुगाच्या दरात वाढ झाली नाही. उलट त्या दरात घसरण नोंदविली जात आहे. बुधवारी खुल्या बाजारात भुईमुगाला ६२०० रूपये क्विंटलचा दर मिळाला. यातून शेतकऱ्यांची पार निराशा झाली आहे. भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांनी भुईमूग विक्रीसाठी काढला आहे. याचवेळी भुईमुगाचे दर घसरले आहे.
राज्यातील विविध बाजारसमितींमधील भुईमूग आवक व मिळालेला दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
11/07/2024 | ||||||
अमळनेर | लोकल | क्विंटल | 2 | 5700 | 5700 | 5700 |
हिंगोली | लोकल | क्विंटल | 800 | 6100 | 6660 | 6380 |
धुळे | एस.बी ११ | क्विंटल | 22 | 6375 | 7025 | 6650 |
हेही वाचा - Fruits to Eat & Avoid in Rainy Season : पावसाळ्यात हि फळं खा; 'ही' अजिबात खाऊ नका