Join us

Groundnut Market भुईमूग दरात घसरण; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 3:20 PM

भुईमूग दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असतांना दरात झालेल्या घसरणीभुळे शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे.

भुईमूग दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असतांना दरात झालेल्या घसरणीभुळे शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. यातून शेतमालाचा बाजार चांगलाच हादरला आहे. गतवर्षी यवतमाल जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवर उन्हाळी भुईमुगाची लागवड केली होती. दरवर्षी पेक्षा गतवर्षी भुईमुगाचे क्षेत्र वाढलेले आहे.

यावेळी वातावरणामुळे भुईमुगाच्या उत्पादनात वाढ झाली. अशावेळी शेतकऱ्यांना चांगले दर मिळणे अनपेक्षित होते. यामुळे शेतकऱ्यांनी भुईमूग राखून ठेवला होता.

परंतु भुईमुगाच्या दरात वाढ झाली नाही. उलट त्या दरात घसरण नोंदविली जात आहे. बुधवारी खुल्या बाजारात भुईमुगाला ६२०० रूपये क्विंटलचा दर मिळाला. यातून शेतकऱ्यांची पार निराशा झाली आहे. भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांनी भुईमूग विक्रीसाठी काढला आहे. याचवेळी भुईमुगाचे दर घसरले आहे.

राज्यातील विविध बाजारसमितींमधील भुईमूग आवक व मिळालेला दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/07/2024
अमळनेरलोकलक्विंटल2570057005700
हिंगोलीलोकलक्विंटल800610066606380
धुळेएस.बी ११क्विंटल22637570256650

हेही वाचा - Fruits to Eat & Avoid in Rainy Season : पावसाळ्यात हि फळं खा; 'ही' अजिबात खाऊ नका

टॅग्स :बाजारयवतमाळविदर्भशेतकरीशेतीशेती क्षेत्रपीक