Join us

धाराशिवसह परभणी, वाशिममध्येही सोयाबीनला हमीभाव, उर्वरित कोणत्या बाजारसमितीत मिळतोय भाव?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 16, 2024 3:05 PM

राज्यात सोयाबीन विक्रीमध्ये मागील चार दिवसांपासून चढउतार दिसत आहे.

राज्यात सोयाबीन विक्रीमध्ये मागील चार दिवसांपासून चढउतार दिसत आहे. दरम्यान, आज सकाळच्या सत्रात राज्यात वेगवेगळ्या बाजारसमितींमध्ये ०९ हजार ८ क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे.

विदर्भातून सध्या सर्वाधिक सोयाबीनची आवक होत असून मराठवाड्यातून आवक घटली आहे. आज अमरावती बाजारसमितीत ४६२७ क्विंटल लोकल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण ४५५० रुपयांचा भाव मिळाला.

आज बहुतांश ठिकाणी पिवळ्या सोयाबीनची आवक होत असून हमीभाव मिळत असल्याचे चित्र होते. धाराशिवमध्ये आज ७७ क्विंटल पिवळ्या सोयाबीनला ४६२५ रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. तर जालना बाजारसमितीतही ४४७५ रुपये भाव सुरु आहे.

जाणून घ्या बाजारसमितीनिहाय आवक व बाजारभाव

16/04/2024
अमरावतीलोकल4627450046004550
बुलढाणापिवळा18435145004400
छत्रपती संभाजीनगरपिवळा9430043004300
धाराशिव---75462546254625
धाराशिवपिवळा2400145514550
हिंगोलीपिवळा70435045004425
जालनापिवळा34440045764475
नागपूरलोकल919420046504538
परभणीपिवळा29453645364536
वर्धापिवळा85385044054350
वाशिम---3350431346354530
यवतमाळपिवळा390440045004450
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)9608
टॅग्स :सोयाबीनबाजार