कऱ्हाड : येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केट यार्डमध्ये दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ विक्रीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी पहिल्या सौद्यामध्ये गुळाला प्रतिक्विंटल ४ हजार ३०१ एवढा विक्रमी दर मिळाला.
बाजार समितीचे सभापती दीपक ऊर्फ प्रकाश आकाराम पाटील, उपसभापती संभाजी श्रीरंग काकडे, संचालक विजयकुमार कदम, संभाजी चव्हाण, शंकरराव ऊर्फ सतीश इंगवले, सर्जेराव गुरव, राजेंद्र चव्हाण, नितीन ढापरे, जयंतीलाल पटेल, जगन्नाथ लावंड, गणपत पाटील, सचिव आबासो पाटील यांची उपस्थिती होती.
सौद्यामध्ये बी. के. पाटील कंपनी यांच्या आडत दुकानात वसंतगड येथील सचिन पाटील या शेतकऱ्याच्या गुळाला प्रतिक्विंटल ४ हजार ३०१ एवढा विक्रमी दर मिळाला. सदरचा गूळ ओम ट्रेडर्स आणि कंपनी यांनी खरेदी केला आहे. या सौद्यामध्ये गुळाला सरासरी चार हजार एवढा दर मिळाला.
यावेळी अर्जुन पाटील, देवेंद्र संगोई, उल्हास शेठ, शिवाजी पवार, केतन शहा, ओम गाला, शिवप्पा खांडेकर, अशोक संसुद्दी, उत्तमराव जाधव, रवी पाटील, सर्जेराव पाटील, राजेंद्र पवार, सुमित गांधी, जयेश संगोई, जिग्नेश शहा, विनोद संसुधी, दिग्विजय पाटील, सागर पाटील, ऋषभ संगोई, सुहास लावंड, मेहूल शेठ, संग्राम पवार यांच्यासह गूळ मार्केटमधील आडते, खरेदीदार व्यापारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी गूळ रसाळ, भेसळविरहित आणावाशेतकऱ्यांनी आपला गूळ रसाळ, कणीदार चिक्की स्वरुपाचा, भेसळविरहित विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती दीपक ऊर्फ प्रकाश पाटील व उपसभापती संभाजी काकडे यांनी केले आहे.