Lokmat Agro >बाजारहाट > Halad BajarBhav : संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची दररोज किती आवक; जाणून घ्या सविस्तर

Halad BajarBhav : संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची दररोज किती आवक; जाणून घ्या सविस्तर

Halad BajarBhav: How much turmeric arrives daily at Sant Namdev Market Yard; Know in detail | Halad BajarBhav : संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची दररोज किती आवक; जाणून घ्या सविस्तर

Halad BajarBhav : संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची दररोज किती आवक; जाणून घ्या सविस्तर

Halad BajarBhav : सध्या हळद काढणीला वेग आल्यामुळे आता बाजारात आवक वाढत आहे. हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची आवक (Turmeric Arrives) वाढली आहे. दररोज किती क्विंटल आवक होते ते जाणून घ्या सविस्तर.

Halad BajarBhav : सध्या हळद काढणीला वेग आल्यामुळे आता बाजारात आवक वाढत आहे. हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची आवक (Turmeric Arrives) वाढली आहे. दररोज किती क्विंटल आवक होते ते जाणून घ्या सविस्तर.

शेअर :

Join us
Join usNext

Halad BajarBhav : हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात सोमवारी हळदीची आवक (Turmeric Arrives) वाढली होती. दुपारी १२ वाजेपर्यंत जवळपास तीन हजार क्विंटलची आवक झाली होती, तर सरासरी ११ हजार ५०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला. (Halad BajarBhav)

पंधरवड्यापासून हळद काढणीला प्रारंभ झाला आहे. काही शेतकऱ्यांकडे हळद उपलब्ध झाली असून, ते आता विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे आवक (Turmeric Arrives) वाढत आहे.
सोमवारी तब्बल तीन हजार क्विंटलची आवक झाली. 

शेतकरी सकाळी सहा वाजल्यापासूनच हळद घेऊन मार्केट यार्डात दाखल होत होते, तर दुपारी १२ वाजेपर्यंत तीन हजार क्विंटलची आवक झाली. नवीन हळदीला ११ हजार ते १२ हजार ५०० रुपये भाव मिळाला. (Halad BajarBhav)

आवक आणखी वाढणार

सध्या काही शेतकऱ्यांकडेच हळद विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे, तर बहुतांश शेतकऱ्यांचे हळद काढणीचे काम सुरू आहे. ही हळद उपलब्ध होताच मार्केट यार्डात आवक वाढणार आहे. (Halad BajarBhav)

यंदा हंगामात दररोज किमान साडेतीन ते चार हजार क्विंटलची आवक होईल, असा अंदाज बाजार समिती प्रशासनाने वर्तविला आहे.

शेतकऱ्यांना भाववाढीची आशा

 मागीलवर्षी हळदीला सरासरी १४ हजार रुपयांवर भाव मिळाला होता. यंदा मात्र कमाल दर १२ हजार ५०० रुपयांवर जात नाहीत, तर सरासरी ११ ते ११ हजार ५०० रुपये एवढाच भाव मिळत आहे. परिणामी, शेतकऱ्यांची निराशा होत आहे. येणाऱ्या दिवसांत तरी हळदीचे भाव वाढावेत, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. (Halad BajarBhav)

मार्केट यार्डात वाहनांची रांग

शेतकऱ्यांकडे हळद उपलब्ध झाल्यामुळे मार्केट यार्डात आवक वाढत आहे. सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासूनच वाहने दाखल होत होती, तर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्डाच्या मुख्य गेटपर्यंत वाहनांची रांग लागली होती. जवळपास ३० ते ४० वाहनांद्वारे हळद विक्रीसाठी आली होती.

हे ही वाचा सविस्तर : Dam Water Storage : जलसाठ्यात झपाट्याने घट; जाणून घ्या काय आहे कारण

Web Title: Halad BajarBhav: How much turmeric arrives daily at Sant Namdev Market Yard; Know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.