Halad Bajarbhav : वसमत येथील मोंढ्यात नवीन हळद येण्यास सुरुवात झाली असून सोमवारी २ हजार हळदीच्या कट्ट्यांची आवक (halad arrivals) झाली होती. यावेळी झालेल्या बिटात दर्जेदार हळदीस १२ हजार ३०५ रुपयांचा भाव मिळाला.
कृषी उत्पन्न बाजार समिती मोंढ्यात १० मार्च रोजी नवीन हळदीच्या जवळपास दोन हजार कट्टयांची आवक झाली. यावेळी हळदीचे बीट पुकारण्यात येऊन हळदीस ९ हजारांपासून ते १२ हजारापर्यंत भाव मिळाला. परंतु दर्जेदार हळदीस १२ हजार ३०५ रुपयांचा भाव मिळाला. (halad arrivals)
नवीन हळद घेऊन आलेल्या विक्रम पांडोजी जाधव या शेतकऱ्याचा व्यापाऱ्यांनी दस्ती, टोपी देत सत्कार केला. यावेळी व्यापारी पुष्पेंद्र जैन, कैलास काबरा, रियाज हवालदार, संजय भोसले, दौलत हुंबाड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
भाव वाढीची आशा
* वर्षभरापासून हळदीच्या भावात चढ-उतार होत आहे.
* भविष्यात हळदीच्या दरात तेजी येईल, या हेतूने जुनी हळद व्यापाऱ्यांनी गोदामात तर शेतकऱ्यांनी आखाड्यावर साठवून ठेवली आहे.
* सद्यस्थितीत गतवर्षीपेक्षा हळदीस कमी भाव मिळत आहे. भविष्यात हळदीचे भाव वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
हळदीच्या भावात तेजी येईल
मार्चमध्ये हळद काढणीस सुरुवात झाली असून मोंढ्यात नवीन हळद येणे सुरू झाले आहे. सध्या हळदीचे भाव १२ हजारांपर्यंत जात आहेत. भविष्यात हळदीचे दर वाढतील, अशी आशा आहे. - पुष्पेंद्र जैन, व्यापारी
शेतमाल : हळद/ हळकुंड
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|
10/03/2025 | ||||||
नांदेड | --- | क्विंटल | 620 | 8345 | 12345 | 11450 |
भोकर | --- | क्विंटल | 13 | 8300 | 10300 | 9300 |
हिंगोली | --- | क्विंटल | 1040 | 9000 | 11000 | 10000 |
हे ही वाचा सविस्तर : Halad BajarBhav : नवीन हळद बाजारात दाखल; मुहूर्ताला काय मिळाला भाव वाचा सविस्तर