Halad Market : रिसोड येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील महिन्यांत २४ ऑक्टोबर रोजी कान्डी आणि गटू हळदीला चांगला दर मिळाला; परंतू २८ नोव्हेंबरला दोन्ही प्रकारच्या हळदीच्या दरात क्विंटलमागे हजार रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.
२४ ऑक्टोबर रोजी रिसोडच्या बाजार समितीमध्ये कान्डी हळदीला १२ हजार ५३० ते १३ हजार ७५० रुपये आणि गटू हळदीला ११ हजार ९९० ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तर तब्बल १ महिन्यानंतर २८ नोव्हेंबरला मात्र कान्डी ११ हजार ५०० ते १३ हजार ९०० आणि गटू हळदीला १० हजार ३०० ते १२ हजार ८०० रुपये दर देण्यात आला. दरातील या घसरणीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२९ नोव्हेंबर) रोजी हळदीची आवक २८३ क्विंटल झाली तर त्याला कमीत कमी दर हा ११ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा १३ हजार ६५० रुपये प्रति क्विंटल मिळाला तर सर्वसाधारण दर हा १२ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
शेतमाल : हळद/ हळकुंड
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
29/11/2024 | ||||||
नांदेड | --- | क्विंटल | 283 | 11000 | 13650 | 12500 |
28/11/2024 | ||||||
हिंगोली | --- | क्विंटल | 1362 | 12100 | 14500 | 13300 |
बसमत | लोकल | क्विंटल | 1133 | 11200 | 15000 | 13100 |
(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)
हे ही वाचा सविस्तर
Ghonas Snake : थंडीत सुरु होतो या अतिविषारी सापाच्या प्रजननाचा काळ कशी घ्याल काळजी
https://www.lokmat.com/agriculture/smart-farming/ghonas-snake-how-to-take-care-of-the-breeding-season-of-this-highly-poisonous-snake-which-starts-in-winter-a-a975/