बाजारात आवक वाढली की, दर पडतात, प्रामुख्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी हा प्रकार पाहायला मिळतो, हा अनुभव असल्याने शेतकरी शेतमालाच्या विक्रीबाबत सावध पवित्रा घेत आहेत. (Halad arrivals)
त्यामुळेच बाजार समितीत दहा दिवसांनी लिलाव होऊनही हळदीची आवक मात्र कमी झाल्याचे दिसले. सोमवारी वाशिम बाजार समितीत ६,५०० क्विंटल हळदीची आवक झाली होती. (Halad arrivals)
शनिवार, रविवारच्या सलग सुट्यानंतर बाजार समित्यांमध्ये आठवड्याचा पहिल्या दिवशी शेतकरी शेतमालाच्या विक्रीवर भर देतात. त्यामुळे शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. (Halad arrivals)
आवक वाढली की, दरात मात्र घसरण होते. हा अनुभव वारंवार शेतकऱ्यांना येतो. त्यामुळे शेतकरी आता बाजाराचा अंदाज घेऊनच शेतमालाची विक्री करीत आहेत.
याचा प्रत्यय सोमवारी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत आला. नियोजनानुसार शुक्रवारी या बाजार समितीत हळदीचा लिलाव होतो; परंतु सुट्यामुळे बाजार समिती बंद असल्याने सोमवारी हळदीचा लिलाव घेण्यात आला.
हळदीला किती मिळाला दर?
कांडी हळद १४६६०
गहू हळद १३५५०
११ एप्रिल रोजी १३,७०० क्विंटल आवक
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत ११ एप्रिल रोजी १३,७०० क्विंटल हळदीची आवक झाली होती. सोमवारी मात्र, या ठिकाणी केवळ ६,५०० क्विंटल हळदीची आवक झाली. अर्थात गेल्या वेळच्या तुलनेत सोमवारी हळदीची आवक निम्म्यावरच आल्याचे दिसून आले.
गतवेळच्या तुलनेत दरात घसरणच!
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत ११ एप्रिल रोजी कांडी हळदीला किमान १२,४५० ते कमाल १४,७०० रुपये, तर गट्ट हळदीला १२,०५० ते १३,५०० रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला होता. सोमवारी मात्र तुलनेत हळदीला थोडा कमीच दर मिळाल्याचे दिसून आले.
हे ही वाचा सविस्तर : Chia Crop: चिया पिकाची निवड का करावी? जाणून घ्या सविस्तर