फळांचा राजा आंब्याचे वेध सर्वांना लागले आहेत. सर्व खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हापूस आंबाबाजारात दाखल झाला आहे. येत्या आठवडाभरात 'केशरी पायरी' आंब्याचेही आगमन होणार आहे.
थंडी कमी होताच आबालवृद्ध ज्याची आतुरतेने वाट पाहतात तो आंबाबाजारात आला. आता जूनपर्यंत सर्व प्रकारचे आंबे येतील.
मात्र, यंदा सर्वप्रथम बाजारात दाखल होण्याची बाजी 'हापूस'ने मारली आहे. मागील वर्षीही हापूसच सर्वप्रथम दाखल झाला होता. मार्चध्ये हापूसचे तर मे मध्ये केशर आंब्याचे आगमन होईल.
किती रुपयाला हापूस? कोकणातून देवगड येथून आंब्याची आवक झाली आहे. १००० ते २५०० रुपयाला १२ नग असा आंबा विकला जात आहे. आठ दिवस झाले बाजारामध्ये हापूस आंबा देवगड, रत्नागिरी कोकणातून दाखल झाला आहे. सध्या आवक कमी असून आठवड्यात ती वाढेल, अशी माहिती व्यापारी सागर मदने यांनी दिली.