Join us

Hapus Mango: आवक वाढल्याने देवगडचा हापूस आंबा तोऱ्यात! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:05 IST

Hapus Mango : उन्हाळा सुरू झाला की आंब्याच्या गोडव्याची आठवण प्रत्येकालाच होते. मार्चच्या सुरुवातीलाच बाजारात आंबा दाखल झाला होता. आता आंब्यांची आवक (arrivals) वाढली असून, देवगडच्या हापूसला चांगली मागणी आहे. (Hapus Mango)

Hapus Mango : उन्हाळा सुरू झाला की आंब्याच्या गोडव्याची आठवण प्रत्येकालाच होते. मार्चच्या सुरुवातीलाच बाजारातआंबा दाखल झाला होता. आता आंब्यांची आवक(arrivals) वाढली असून, देवगडच्या हापूसला चांगली मागणी आहे.(Hapus Mango)

सद्यःस्थितीत दोन दिवसांआड १५ ते २० पेटी देवगड हापूसची आवक(arrivals) होत आहे. या आंब्याला ७०० ते ११०० रुपये डझनचा दर मिळत आहे. यावर्षी हंगाम सुरू झाल्यापासून आंब्याला चांगला दर मिळत आहे.

कोकणातील हापूस हा आपल्या वेगळ्या चवीसाठी जगभर प्रसिद्ध असून, त्याला जगभरातून मोठी मागणी आहे. खामगावच्या फळ बाजारात हापूसची आवक (arrivals) वाढत आहे. यासोबत केरळचा हापूस आंबाही बाजारात दाखल झाला आहे.

या आंब्याला २०० रुपये किलोपर्यंत दर मिळत असून, १०० क्रेटपर्यंत आठवड्यातून दोन-तीन वेळा आवक(arrivals) होत आहे.

हापूसच्या गोडव्याने वेड लावले!

* देवगडचा हापूस आपल्या खास चव, सुवास आणि रंगासाठी जगभर प्रसिद्ध आहे.

* विक्रीस येणाऱ्या हापूसच्या पेट्यांमध्ये गुणवत्ता लक्षणीय असून, तो ग्राहकांचा विश्वास संपादन करत आहे.

* अनेक ग्राहक दोन दिवसांचीही वाट पाहावी लागली तरी चालेल; पण खऱ्या हापूसची चव हवी, असे म्हणत आहेत.

* भाव नियंत्रणात असल्याने खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

शेतकऱ्यांसाठी संधी

* हापूसची वाढती मागणी पाहता थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत माल पोहोचवण्याच्या नव्या व्यावसायिक संधी निर्माण होत आहेत.

* ऑनलाइन ऑर्डर, थेट शेतातून वितरण योजना सध्या चर्चेत असून, शेतकरी गटांनी त्याची अंमलबजावणीही करणे गरजेचे आहे.

केरळ, मुंबई येथून आवक

फक्त कोकण नव्हे तर केरळमधील हापूससदृश आंब्यांची आवकही खामगावात होत आहे. या आंब्याला १८० ते २०० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. याशिवाय आंध्र प्रदेशातून येणारा बेगनपल्ली, दशहरी, बदाम आंबादेखील ग्राहकांपर्यंत पोहोचू लागला आहे.

मागील काही दिवसांपासून खामगावच्या फळबाजारात आंब्याची आवक वाढली आहे. सद्य: स्थितीत दररोज ४०० ते ५०० क्रेट आवक होत आहे. पुढील काही दिवसांत आणखी आवक वाढणार आहे. - शेख इरफान, फळ व्यावसायिक

दरवर्षीप्रमाणे हापूस खरेदीसाठी वाट पाहत होतो. यंदा चव आणि दर दोन्ही संतोषजनक आहेत. पहिल्यांदा घेतलाय; पण पुन्हा घेणार आहे. - वैशाली देशमुख, गृहिणी

आंब्याला असे मिळताहेत दर (किलोत)

दशहरी१५०
लालबाग१५०
गुलाबखश१५०
बेगनपल्ली१२०
बदाम१२०

हे ही वाचा सविस्तर : Pik Vima: काय सांगताय! जमीन एकाची अन् पीक विमा काढला दुसऱ्यानेच जाणून घ्या काय आहे प्रकरण

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीआंबाआंबाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड