Join us

Harabhara Market : हरभऱ्याची आवक मंदावताच भाव वधारले 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 12:57 PM

Harabhara Market : हरभऱ्याची आवक किती झाली आणि भाव किती ? ते जाणून घेऊयात.

Harabhara Market : 

हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात चार दिवसांपासून हरभऱ्याची सरासरी आवक मंदावल्याने भाव वधारले आहेत. २१ ऑगस्ट रोजी हरभऱ्याने साडेसात हजारांचा पल्ला गाठला तर सरासरी ७ हजार १०० रुपयांचा भाव राहिला.रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी गव्हापेक्षा हरभऱ्याच्या पेऱ्यावर अधिक भर दिला. त्यामुळे यंदा हरभऱ्याचे उत्पादन समाधानकारक झाले होते. परंतु, हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही. सरासरी ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांदरम्यान हरभऱ्याची विक्री करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. आता बहुतांश शेतकऱ्यांकडील हरभरा संपला असताना भावात वाढ झाली आहे. मागील चार दिवसांपासून क्विंटलमागे जवळपास एक हजार रुपयाने वाढ झाली आहे.आठवड्यापूर्वी सरासरी २०० ते २५० क्विंटलची हरभऱ्याची आवक होत होती. बुधवारी मात्र आवक मंदावली होती.  मोंढ्यात सुमारे शंभर क्विंटल हरभऱ्याची आवक झाल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले. तर भाव किमान ६ हजार ९०० ते कमाल ७ हजार ५०० रुपयांदरम्यान मिळाला.दरम्यान, सध्या भावात वाढ झाली तरी बहुतांश शेतकऱ्यांकडे हरभरा शिल्लक नाही. त्यामुळे या भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांना होणार आहे. 

गहू, ज्वारीचा भाव स्थिर मोंढ्यात सध्या गव्हाची आवक वाढली असून, भाव मात्र स्थिर आहेत. बुधवारी ३५१ क्विंटल गहू विक्रीसाठी आला होता. किमान १ हजार ८११ ते जास्तीत जास्त ३ हजार ६० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. तर ८१ क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. १ हजार ३६१ ते ३ हजार रुपये क्विंटलने विक्री झाली. 

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड