Join us

हरभऱ्याला सध्या या बाजारपेठेत चांगला बाजारभाव, क्विंटलमागे आज असा मिळतोय भाव..

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 18, 2024 2:49 PM

राज्यात हरभऱ्याची आवक वाढली असून लाल, काट्या, गरडा जातींसह काबूली, बोल्ड जातींच्या हरभऱ्याची आवक झाली. लोकल हरभऱ्यासह हायब्रीड हरभराही ...

राज्यात हरभऱ्याची आवक वाढली असून लाल, काट्या, गरडा जातींसह काबूली, बोल्ड जातींच्या हरभऱ्याची आवक झाली. लोकल हरभऱ्यासह हायब्रीड हरभराही आज बाजारपेठेत आला होता. शेतकऱ्यांनी विविध बाजारसमित्यांमध्ये एकूण १६ हजार ७७६ क्विंटल हरभरा विक्रीसाठी आणला होता.

राज्यात आज जळगावमध्ये हरभऱ्याला सर्वाधिक बाजारभाव मिळत आहे. लाल, काबूली चण्यासह बोल्ड जातीचा हरभरा बाजारपेठेत दाखल झाला होता. बोल्ड जातीच्या हरभऱ्याला आज सर्वोच्च दर मिळत असून मागील दोन दिवसांपेक्षा आजचा दर अधिक आहे. क्विंटलमागे ९ हजार ९७५ रुपयांचा भाव मिळाला.

वाशिमच्या लाल हरभऱ्याला सर्वसाधारण ५३५५ रुपये भाव मिळत आहे. दोन दिवसांपासून हिंगोलीच्या १८२ क्विंटल हरभऱ्याला साधारण दर ५६०० ते ५७०० असाच राहिला आहे. धाराशिवच्या काट्या जातीच्या हरभऱ्याला ५५०० रुपये क्विंटलमागे भाव मिळाला. तर गरड्या हरभऱ्याला साधारण ५८०० रुपये भाव होता.

जाणून घ्या कोणत्या बाजारसमितीत काय दर?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/03/2024
अमरावतीलोकल8313540061005750
धाराशिवगरडा28550055105500
धाराशिवकाट्या70540056005500
हिंगोलीलाल182542557505613
जळगावहायब्रीड40443052405200
जळगावचाफा63533056005400
जळगावलाल7815081508150
जळगावकाबुली14625073257325
जळगावबोल्ड18997599759975
नागपूरलोकल1555510055955471
नाशिकलोकल3450053855300
परभणीगरडा13545055275500
वाशिम---6100500055705355
यवतमाळलाल370540055005450
टॅग्स :हरभराबाजारमार्केट यार्ड