हिंगोली येथील मोंढ्यात आठवडाभरापासून हरभऱ्याची आवक वाढली आहे. सरासरी ८०० क्विंटलची आवक होत असून, भाव सहा हजारांचा मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बरा भाव मिळत आहे; परंतु लागवड खर्चाच्या तुलनेत हा भाव कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरवर्षी रब्बीत गव्हाच्या पेऱ्यावर शेतकरी भर देतात; परंतु यंदा मात्र गव्हापेक्षा जवळपास दुप्पट क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली होती जानेवारी, फेब्रुवारीत झालेल्या अवकाळी पावसामुळे हरभऱ्याला फटका बसला. तसेच गव्हाचेही नुकसान झाले; परंतु पेरा अधिक असल्याने यंदा गव्हापेक्षा हरभऱ्याचे उत्पादन अधिक झाले.
मागील दीड महिन्यापासून नव्या हरभऱ्याची आवक मोंढ्यात होत आहे. प्रारंभी सरासरी ३०० ते ४०० क्विंटल हरभरा विक्रीसाठी येत होता.
आता आवक वाढली असून, ७ मे रोजी ८२५ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती. किमान ५ हजार ६९० तर कमाल ६ हजार १४० रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाली.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा हरभऱ्याला समाधानकारक भाव मिळत आहे; परंतुलागवड खर्चात वाढ झाली आहे. त्यातच अपेक्षित उत्पादनही झाले नसल्याने सध्या मिळणारा भाव परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
राज्यातील आजचे (०८ मे) हरभरा बाजारभाव व आवक
पुणे | --- | क्विंटल | 40 | 6300 | 7400 | 6850 |
राजूरा | --- | क्विंटल | 6 | 5740 | 5800 | 5775 |
मालेगाव (वाशिम) | --- | क्विंटल | 218 | 5700 | 5900 | 5800 |
कल्याण | हायब्रीड | क्विंटल | 3 | 5800 | 64000 | 6100 |
लातूर | लाल | क्विंटल | 7209 | 5870 | 6240 | 5900 |
हिंगोली- खानेगाव नाका | लाल | क्विंटल | 82 | 5650 | 6000 | 5825 |
अमरावती | लोकल | क्विंटल | 3165 | 5850 | 6050 | 5950 |
हेही वाचा - गूळ शेंगदाणे नियमित सेवन केल्यास अॅसिडिटीपासून होते सुटका; हाडेही होतात मजबूत