Join us

Harbhara Market : शेतकऱ्यांचा हरभरा संपला दर गेला साडेसात हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 11:54 AM

बारामती : काळ्या रानात कमी पाण्यात येणारे पीक म्हणून हरभरा पिकाकडे पाहिले जाते. अवघ्या दोन पाण्यांवर हे पीक येते. ...

बारामती : काळ्या रानात कमी पाण्यात येणारे पीक म्हणून हरभरा पिकाकडे पाहिले जाते. अवघ्या दोन पाण्यांवर हे पीक येते. त्यामुळे हे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे.

सध्या हरभऱ्याचा भाव साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दराकडे गेला आहे.  शेतकऱ्यांजवळ माल आला की भाव कोसळतात आणि त्यांच्याजवळील माल संपला की भाव वाढतात, हे वास्तव आहे.

सर्व जिल्ह्यांत अशीच स्थिती आहे. शेतकरी साधारणतः ऊस गेल्यावर १५ नोव्हेंबरच्या पुढे अगदी गारठा चांगला असल्यास १५ जानेवारीपर्यंत या पिकाची लागवड करतात, चार महिन्यांत या पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे मार्चअखेर किंवा एप्रिलच्या मध्यास हे पीक काढणीला येते.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये १ जानेवारी ते आजपर्यंत आठ महिन्यांत ६७३६ क्विंटल आवक झाली. त्यापैकी मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत निम्म्यापेक्षा अधिक म्हणजेच ४१७८ क्विंटल आवक झाली आहे.

या काळात हरभरा काढणी होते. त्या काळात शेतकरी लागवड खर्च, कौटुंबिक खर्च काढण्यासाठी हाती आलेले पीक विकून रिकामा होतो. या काळात शेतकऱ्यांना किमान ५००० ते कमाल ७००० रुपये प्रतिक्विंटल दर अधिक मिळाला.

शेतकऱ्यांना एकरी ८ ते १२ क्विंटल उत्पादन मिळते. सध्या मिळणारा बाजरातील दर पाहता शेतकऱ्यांचे किमान ८००० ते १२००० हजार रुपये नुकसान झाले आहे.

हरभरा दर■ १ जुलै प्रतिक्विंटल दर ६७५० कमाल दर■ १० जुलै प्रतिक्विंटल ६३०० कमाल दर■ १५जुलै प्रतिक्विंटल दर ६४०० कमाल दर■ २२ जुलै प्रतिक्विंटल दर ६३४० कमाल दर■ २५ जुलै प्रतिक्चिटल दर ६०५१ कमाल दर■ १ ऑगस्ट प्रतिक्विंटल दर ६८०० कमाल दर■ १२ ऑगस्ट प्रतिक्विंटल दर ७३१० कमाल दर

स्व-भांडवल नसल्याने फटका■ वाढलेल्या दराचा दैनंदिन शेतकऱ्यांना शून्य टक्के फायदा होतो. ऊस गेल्यावर साधारणतः १५ नोव्हेंबर ते अगदी हवामान अनुकूल असल्यास शेतकरी १५ जानेवारीपर्यंत हरभरा लागवड करतात.■ शेतकऱ्याचा हरभरा चार महिन्यांनी बाजारात येतो. त्यावेळी त्याचे दर पडतात. शेतकरी ते साठवून ठेवू शकतो. त्यामुळे वाढलेल्या दराचा शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो.मात्र,■ सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे स्व-भांडवल नसते. त्यामुळे लागवड खर्च, तसेच कौटुंबिक खर्च काढण्यासाठी शेतकरी मिळेल त्या दराने हरभरा विक्री करतो.■ यंदाच्या वेळी शासनाने दिलेल्या हमीभावापेक्षा अधिक दर बाजारात होता. ५८०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत शेतकऱ्यांना दर मिळाला. मात्र, ९० टक्के शेतकऱ्यांना वाढलेल्या दराचा फायदा होत नाही.■ पीक कोणतेही अ असू द्या, भांडवलासाठी शेतकऱ्यांना माल विकावाच लागतो. स्टोअरला शेतीमाल ठेवणे शक्य होत नसल्याने व्यापाऱ्यांना अधिक फायदा होत असल्याचे शेतकरी शीतल काटे यांनी सांगितले.

टॅग्स :हरभराबाजारमार्केट यार्डबारामतीशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती