Lokmat Agro >बाजारहाट > Harbhara Market : शेतकऱ्यांजवळचा हरभरा संपला अन् दरात झाली वाढ कसा मिळतोय दर

Harbhara Market : शेतकऱ्यांजवळचा हरभरा संपला अन् दरात झाली वाढ कसा मिळतोय दर

Harbhara Market: Harbhara near the farmers has run out and the price has increased | Harbhara Market : शेतकऱ्यांजवळचा हरभरा संपला अन् दरात झाली वाढ कसा मिळतोय दर

Harbhara Market : शेतकऱ्यांजवळचा हरभरा संपला अन् दरात झाली वाढ कसा मिळतोय दर

दा केंद्र शासनाने हरभऱ्याला ५,४४० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. त्या तुलनेत वर्षभर दर पाच हजारांच्या दरम्यान राहिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च पडलेला नाही.

दा केंद्र शासनाने हरभऱ्याला ५,४४० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. त्या तुलनेत वर्षभर दर पाच हजारांच्या दरम्यान राहिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च पडलेला नाही.

शेअर :

Join us
Join usNext

मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा : यंदा केंद्र शासनाने हरभऱ्याला ५,४४० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. त्या तुलनेत वर्षभर दर पाच हजारांच्या दरम्यान राहिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च पडलेला नाही. सध्या साठवणूक केलेला हरभरा शेतकऱ्यांजवळ नाही.

अशा परिस्थितीत आवक कमी झाली व सणासुदीच्या दिवसांत मागणी वाढली. नवीन हरभऱ्याला अवधी आहे. त्यामुळे हरभऱ्याला सोमवारी उच्चांकी ७००० रुपयांपर्यंत क्विंटलला भाव मिळाला आहे. जमिनीत आर्द्रता कमी असल्याने गतवर्षी हरभऱ्याचे सरासरी उत्पादन कमी झाले आहे.

हरभऱ्याचे बाजारभाव
१ जुलै : ५७०० ते ६६००
८ जुलै : ५७०० ते ६३००
१५ जुलै : ५७०० ते ६१००
२२ जुलै : ६००० ते ६२५०
२५ जुलै : ६३०० ते ६४००
५ ऑगस्ट : ५८०० ते ६७००
१२ ऑगस्ट : ६१७० ते ६७५०

पावसाने बऱ्याच शेतकऱ्यांची ज्वारी डॅमेज झाली असल्याने सध्या २००० ते २८०० इतका दर असून चांगली ज्वारी असेल तर ४ हजारापर्यंत दर आहे. हरभरा दर सध्या ७ हजारापर्यंत पोहचले आहेत. - सचिन देशमुख, मार्केट कमिटी

सध्या ज्वारीची बाजारात मागणी कमी असल्याने दरवाढ होण्याची शक्यता नाही. सणासुदीत हरभऱ्याची मागणी वाढत असल्याने थोडीफार दरवाढीची शक्यता आहे. - आनंद खटावकर, व्यापारी, मंगळवेढा

ज्यावेळी शेतकऱ्यांकडे माल नसतो त्यावेळी बाजारपेठेत दर वाढलेले असतात. ज्वारीचे सध्याचे दर पाहता शेतकऱ्यांनी ज्वारी पिकासाठी केलेला खर्च सुद्धा निघत नाही. - सिद्धेश्वर कुरडे, शेतकरी, मंगळवेढा

Web Title: Harbhara Market: Harbhara near the farmers has run out and the price has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.