मल्लिकार्जुन देशमुखेमंगळवेढा : यंदा केंद्र शासनाने हरभऱ्याला ५,४४० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. त्या तुलनेत वर्षभर दर पाच हजारांच्या दरम्यान राहिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च पडलेला नाही. सध्या साठवणूक केलेला हरभरा शेतकऱ्यांजवळ नाही.
अशा परिस्थितीत आवक कमी झाली व सणासुदीच्या दिवसांत मागणी वाढली. नवीन हरभऱ्याला अवधी आहे. त्यामुळे हरभऱ्याला सोमवारी उच्चांकी ७००० रुपयांपर्यंत क्विंटलला भाव मिळाला आहे. जमिनीत आर्द्रता कमी असल्याने गतवर्षी हरभऱ्याचे सरासरी उत्पादन कमी झाले आहे.
हरभऱ्याचे बाजारभाव१ जुलै : ५७०० ते ६६००८ जुलै : ५७०० ते ६३००१५ जुलै : ५७०० ते ६१००२२ जुलै : ६००० ते ६२५०२५ जुलै : ६३०० ते ६४००५ ऑगस्ट : ५८०० ते ६७००१२ ऑगस्ट : ६१७० ते ६७५०
पावसाने बऱ्याच शेतकऱ्यांची ज्वारी डॅमेज झाली असल्याने सध्या २००० ते २८०० इतका दर असून चांगली ज्वारी असेल तर ४ हजारापर्यंत दर आहे. हरभरा दर सध्या ७ हजारापर्यंत पोहचले आहेत. - सचिन देशमुख, मार्केट कमिटी
सध्या ज्वारीची बाजारात मागणी कमी असल्याने दरवाढ होण्याची शक्यता नाही. सणासुदीत हरभऱ्याची मागणी वाढत असल्याने थोडीफार दरवाढीची शक्यता आहे. - आनंद खटावकर, व्यापारी, मंगळवेढा
ज्यावेळी शेतकऱ्यांकडे माल नसतो त्यावेळी बाजारपेठेत दर वाढलेले असतात. ज्वारीचे सध्याचे दर पाहता शेतकऱ्यांनी ज्वारी पिकासाठी केलेला खर्च सुद्धा निघत नाही. - सिद्धेश्वर कुरडे, शेतकरी, मंगळवेढा