Lokmat Agro >बाजारहाट > गव्हाच्या काढणीला होणार सुरुवात, सध्या काय मिळतोय बाजारभाव?

गव्हाच्या काढणीला होणार सुरुवात, सध्या काय मिळतोय बाजारभाव?

Harvesting of wheat will start, what is the current market price? | गव्हाच्या काढणीला होणार सुरुवात, सध्या काय मिळतोय बाजारभाव?

गव्हाच्या काढणीला होणार सुरुवात, सध्या काय मिळतोय बाजारभाव?

पणन विभागाच्या आकडेवारीनुसार, मागील दोन दिवसांच्या गव्हाच्या दराच्या तुलनेत आज गव्हाला मिळणार दर अधिक दिसत आहे.

पणन विभागाच्या आकडेवारीनुसार, मागील दोन दिवसांच्या गव्हाच्या दराच्या तुलनेत आज गव्हाला मिळणार दर अधिक दिसत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

यंदाच्या हिवाळ्यात थंडी कमी आणि अवकाळी पाऊस आणि वादळी वारा असे हवामान राहिल्याने गव्हाची म्हणावी तेवढी वाढ झाली नाही. त्यामुळे यंदा गहू काढणीला साधारण १५- २० दिवसात सुरु होण्याची शक्यता आहे.

ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या लवकर केल्या, त्या शेतकऱ्यांना सध्या क्विंटलमागे २५०० ते ३५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. पणन विभागाच्या आकडेवारीनुसार, मागील दोन दिवसांच्या गव्हाच्या दराच्या तुलनेत आज गव्हाला मिळणार दर अधिक असल्याचे दिसून येत आहे.

आज राज्यात गव्हाची एकूण १८७१ क्विंटल आवक झाली. शरबती, लोकल, १४७ जातीचा गहू बाजारात दाखल झाला असून कमीतकमी २३०० ते ३००० रुपयांपर्यंत गव्हाला भाव मिळत आहे.

ठाण्यात आज ६४० क्विंटल लोकल गव्हाची आवक झाली. क्विंटलमागे गव्हाला मिळणार दर साधारण ३६०० रुपये होता. तर पुण्यातील बाजारसमितीत एकूण ४२४ क्विंटल शरबती गव्हाची आवक झाली.

उर्वरित बाजारसमित्यांमध्ये काय मिळतोय भाव?

जिल्हा

आवक

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

छत्रपती संभाजीनगर

87

2300

3251

2776

जळगाव

48

2600

2750

2700

जालना

50

2150

2410

2200

नागपूर

100

2402

2566

2500

नागपूर

174

3100

3500

3400

पालघर

345

2910

3443

3188

पुणे

424

4600

5200

4900

ठाणे

640

3400

3800

3600

ठाणे

3

2500

2900

2700

राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)

1871


 

  

 

Web Title: Harvesting of wheat will start, what is the current market price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.