यंदाच्या हिवाळ्यात थंडी कमी आणि अवकाळी पाऊस आणि वादळी वारा असे हवामान राहिल्याने गव्हाची म्हणावी तेवढी वाढ झाली नाही. त्यामुळे यंदा गहू काढणीला साधारण १५- २० दिवसात सुरु होण्याची शक्यता आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या लवकर केल्या, त्या शेतकऱ्यांना सध्या क्विंटलमागे २५०० ते ३५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. पणन विभागाच्या आकडेवारीनुसार, मागील दोन दिवसांच्या गव्हाच्या दराच्या तुलनेत आज गव्हाला मिळणार दर अधिक असल्याचे दिसून येत आहे.
आज राज्यात गव्हाची एकूण १८७१ क्विंटल आवक झाली. शरबती, लोकल, १४७ जातीचा गहू बाजारात दाखल झाला असून कमीतकमी २३०० ते ३००० रुपयांपर्यंत गव्हाला भाव मिळत आहे.
ठाण्यात आज ६४० क्विंटल लोकल गव्हाची आवक झाली. क्विंटलमागे गव्हाला मिळणार दर साधारण ३६०० रुपये होता. तर पुण्यातील बाजारसमितीत एकूण ४२४ क्विंटल शरबती गव्हाची आवक झाली.
उर्वरित बाजारसमित्यांमध्ये काय मिळतोय भाव?
जिल्हा | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|
छत्रपती संभाजीनगर | 87 | 2300 | 3251 | 2776 |
जळगाव | 48 | 2600 | 2750 | 2700 |
जालना | 50 | 2150 | 2410 | 2200 |
नागपूर | 100 | 2402 | 2566 | 2500 |
नागपूर | 174 | 3100 | 3500 | 3400 |
पालघर | 345 | 2910 | 3443 | 3188 |
पुणे | 424 | 4600 | 5200 | 4900 |
ठाणे | 640 | 3400 | 3800 | 3600 |
ठाणे | 3 | 2500 | 2900 | 2700 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 1871 |
|